Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया

महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे विनोद तावडे आता राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत प्रवेश करत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 04, 2026 | 04:03 PM
Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया
Follow Us
Follow Us:
  • संघटनात्मक कौशल्याचा गौरव आणि दिल्लीत मोठी जबाबदारी
  • महायुतीतील प्रमुख मित्रपक्षाचा सन्मान आणि दलित मतांचे संवर्धन
  • आदिवासी समाज आणि महिलांना प्रतिनिधीत्व देऊन विदर्भातील ताकद वाढवणे
Maharashtra Rajya Sabha Election: भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नावांचा समावेश असून, पक्षाने सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्यावर भर दिला आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील ४ नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात रामदास आठवले, विनोद तावडे, माया इनवाते आणि रामराव वडकुते यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने  राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवून पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.

उमदेवारी जाहीर होताच काय म्हणाले?

विनोद तावडे यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी मिळाल्यानंतर विनोद तावडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. “अनंत आभार आणि धन्यवाद! पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार! माननीय पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही नेहमीच देशहिताची सेवा करण्यास वचनबद्ध आहोत. या नामांकनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणयांचे मनापासून आभार! ही नवीन जबाबदारी पूर्ण समर्पण आणि निष्ठेने पार पाडण्यासाठी मी दृढ आणि वचनबद्ध आहे.

Rajysabha Election 2026: राज्यसभेसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! महाविकास आघाडीतील फुटीचा फायदा घेणार; ५ जागा लढवण्याच्या तयारीत

भाजपचा हुकुमाचा इक्का

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे संघटनात्मक कौशल्य आणि पक्षनिष्ठा हे राज्यसभेची उमेदवारी जाहीर होण्यामागचे खरे कारण मानले जात आहेत. विशेषत: बिहार आणि इतर राज्यांमधील निवडणुकांच्या काळात त्यांची कामगिरी या निर्णयामागे निर्णायक ठरली आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये नितीश कुमार यांनी NDAची साथ सोडल्यानंतर भाजपने विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली. बिहारसारख्या राज्यात तावडेंनी बूथ स्तरापर्यंत भाजपची संघटना मजबूत करत तेथील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह भरला. तावडेनी बूथ स्तरापर्यंत भाजपची संघटना मजबूत करण्याचे काम केले. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत विनोद तावडेंच्या सुक्ष्म नियोजनामुळेच भाजप आणि एनडीएला घववीत यश मिळाले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे विनोद तावडे आता राज्यसभेच्या माध्यमातून संसदेत प्रवेश करत आहेत. अष्टपैलू नेतृत्व आणि संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर त्यांनी मुंबई ते दिल्ली असा थक्क करणारा प्रवास केला आहे.

US-Israel Iran War : केरळात भाजपवर दबाव; लाखो केरळी लोक रोजगारासाठी आखाती देशांत

सद्यस्थिती आणि राज्यसभेची उमेदवारी

राज्यातील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांना महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. विनोद तावडे यांच्यासह रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील विधानसभेच्या संख्याबळानुसार निवडणुकीपूर्वीच तावडेंचा विजय निश्चित मानला जात आहे. या माध्यमातून ते पहिल्यांदाच संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून प्रवेश करतील.

Web Title: Bjps ace in the ring tawdes first reaction as soon as the candidature was announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • Rajya Sabha Election

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.