bjp mla suresh dhas on shivraj diwate case in beed crime news
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण रंगले आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामुळे फक्त बीड नाही तर संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात आला होता. संतोष देशमुख प्रकरणाच्या तपासासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी महायुतीच्या नेत्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे ते चर्चेत आले होते. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र नंतर या दोन्ही नेत्यांची बंद दाराआड चर्चा झाली. मुंडे धस यांच्या भेटीमुळे अनेकांनी रोष व्यक्त केला. यामुळे सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली असून त्यानंतर पहिल्यांदाच सुरेश धस हे मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत.
आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग गावामध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेत चर्चा केली आहे. तसेच देशमुख कुटुंबियांनी आपल्या मागण्या देखील सांगितल्या आहेत. सुरेश धस यांच्यावर आरोपांच्या फैरी झडल्यानंतर ही त्यांची पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा होता नाही, कृष्णा आंधळे फरार आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायाची मागणी करत मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग गावाला भेट दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशमुख कुटुंबीय आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, “बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येच्या केसमध्ये आत्तापर्यंत 9 आरोपी हे 302 मध्ये आले आहेत. 10 वा आरोपी अजून त्यात नाही. त्याचा रोल खंडणी आणि इतर प्रकरणात आहे. वाल्मिक कराडसह इतर 9 लोक हे 302 मध्ये आले आहेत. उपोषणाला बसू नका असे म्हणणार नाही. पण या आपल्या सर्व मागण्या मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार असल्याचे धस यांनी नमूद केलं. आरोपीला मदत करणाऱ्यांची जेल प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. मी उद्या नागपूर किंवा मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेणार. या मागण्यांची पूर्तता झाली तर 25 तारखेला मस्साजोग करांना आंदोलनाची गरज राहणार नाही. ॲडिशनल एसपी म्हणून पंकज कुमावत यांना बीडला आणावे अशी मागणी मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे,” स्पष्ट मत आमदार सुरेश धस यांनी मांडले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुरेश धस यांची भेट घेतल्यानंतर धनंजय देशमुख यांनी देखील माध्यमांसमोर आपल्या मागण्या सांगितल्या आहेत. ते म्हणाले की,बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्येच्या केसमध्ये आत्तापर्यंत 9 आरोपी हे 302 मध्ये आले आहेत. 10 वा आरोपी अजून त्यात नाही. त्याचा रोल खंडणी आणि इतर प्रकरणात आहे. वाल्मिक कराडसह इतर 9 लोक हे 302 मध्ये आले आहेत. उपोषणाला बसू नका असे म्हणणार नाही. पण या आपल्या सर्व मागण्या मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार असल्याचे धस यांनी नमूद केलं. आरोपीला मदत करणाऱ्यांची जेल प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. मी उद्या नागपूर किंवा मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेणार. या मागण्यांची पूर्तता झाली तर 25 तारखेला मस्साजोग करांना आंदोलनाची गरज राहणार नाही. ॲडिशनल एसपी म्हणून पंकज कुमावत यांना बीडला आणावे अशी मागणी मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे, स्पष्ट मत आमदार सुरेश धस यांनी मांडले आहे.
मस्साजोगच्या गावकऱ्यांची मागणी काय?
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशीच सर्वांची मागणी आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात येत आहे. ते नक्कीच होईल. हा खटला 100 टक्के फास्ट ट्रॅक कोर्टातच चालणार आहे, कारण या केसचा तपासही आता अंतिम टप्प्यात आला आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना देखील सहआरोपी करावे. डॉ. संभाजी वायभासे आणि त्यांच्या पत्नी यांनी आरोपींना पैसे पाठवले आहे, यांना सहआरोपी करावे. तसेच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आहे. संतोष देशमुख यांचे पार्थिव असलेली गाडी PSI राजेश पाटील यांनी कळंबकडे वळवली होती. पण ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर गाडी परत वळवली. त्यामुळे राजेश पाटील याला आरोपी केले पाहिजे. तसेच त्याचबरोबर नितीन बिक्कड याने आरोपीना पळून जाण्यास मदत केलीय त्यामुळे त्याला आरोपी केले पाहिजे, अशी मागणी मस्साजोग गावाचे लोक आणि धनंजय देशमुख यांनी केली आहे.