MP Narayan Rane admitted to Jaslok Hospital in Mumbai for surgery political news
MP Narayan Rane in hospital : मुंबई : राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप नेते व खासदार नारायण राणे हे उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. खासदार राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, नारायण राणे यांच्यावर तातडीने उपचार केले जाणार आहेत. मात्र नारायण राणे यांच्यावर कोणती शस्त्रक्रिया होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
खासदार नारायण राणे यांना रुग्णालयामध्ये जसलोक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दुजोरा दिला आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे खासदार नारायण राणे हे रुग्णालयामध्ये दाखल झाले असल्याची पुष्टी झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय आहे रोहित पवारांची पोस्ट?
आमदार रोहित पवार यांनी खासदार नारायण राणे यांच्यासाठी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमधून रोहित पवारांनी लिहिले आहे की, ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांना जसलोक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजली. राणे साहेब तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत, अशा भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांना जसलोक रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समजली. राणे साहेब तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा, माझ्या सदिच्छा आपल्यासोबत आहेत.#Getwellsoon@MeNarayanRane
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 3, 2025
मराठा आरक्षणावर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया?
मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावल्याप्रकरणी मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद मानले आहेत. त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमदार आणि मंत्री नितेश राणे म्हणाले की, हैदराबाद गॅझेट प्रमाणे निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. आतापर्यंत जेव्हा मराठा समाजाने गुलाल उधळला, तो देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कालावधीमध्येच आता मराठा समाजाने याची दखल घेतली पाहिजे. प्रत्येक मराठा समाजातील नागरिकांने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले पाहिजेत, असे नितेश राणेंनी म्हटले.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानताना मंत्री नितेश राणे हे दिसले. मात्र, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी चिंचुद्री म्हटलेल्या विधानावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळतंय. मनोज जरांगे पाटील यांना नितेश राणे नेमकं काय उत्तर देतात, याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. मात्र, हा विषय जास्त न वाढवता त्यांनी भाष्य करणे टाळले आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.