Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री, आमदारांकडून पक्षनिधीसाठी खासदार पार्थ पवार आग्रही; ‘पक्षनिधी द्या, अन्यथा राजीनामा…’

क्षनिधी जमा करण्याबाबतच्या सूचनांचे पालन न झाल्यास वेळप्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागू शकतो, अशा स्वरूपाचा इशारा काही लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2026 | 09:49 AM
पक्षनिधी द्या, अन्यथा राजीनाम्यास तयार राहा

पक्षनिधी द्या, अन्यथा राजीनाम्यास तयार राहा

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षनिधीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, पक्षाची संघटनात्मक वाढ आणि आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी निधी उभारणीवर भर दिला जात असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर खासदार पार्थ पवार यांनी पक्षातील मंत्री आणि आमदारांना पक्षनिधीसाठी ठराविक आर्थिक लक्ष्य दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांना पक्षासाठी निश्चित रक्कम जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अजित पवार हयात असताना त्यांनी अर्थमंत्री म्हणून आमदारांनाही विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीपैकी ठराविक हिस्सा पक्षनिधीसाठी देण्यास सांगण्यात आल्याचे समजते. पक्षाची आर्थिक ताकद वाढवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे हा यामागील उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग; अर्थ किंवा महसूल खात्यासाठी वळसे पाटील यांचे नाव चर्चेत

राजकीय वर्तुळात याबाबत विविध चर्चा सुरू असून, पक्षाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत लोकप्रतिनिधींना स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, पक्षनिधी जमा करण्याबाबतच्या सूचनांचे पालन न झाल्यास वेळप्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागू शकतो, अशा स्वरूपाचा इशारा काही लोकप्रतिनिधींना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही

या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, पक्षनिधी संकलनाबाबत समोर आलेल्या या दाव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पार्थ पवार-भुजबळ आमने-सामने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात एका शासकीय टेंडरवरून तीव्र वाद झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. अन्नधान्य पुरवठ्याच्या कोट्यवधी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत एका विशिष्ट कंत्राटदाराला संधी देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याने हा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Mp parth pawar insists on party funds from ministers and mlas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • parth pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
1

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
2

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
3

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
4

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.