MP Sanjay Raut admitted Fortis Hospital for treatment Raut Health Update
Sanjay Raut in Hospital : मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या तब्येत अचानक बिघडली आहे. भांडुप मधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना उपचारासाठी ॲडमिट करण्यात आलं आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टीज हॉस्पिटल मध्ये आपली रक्त तपासणी केली होती. त्यांना घशाचा त्रास होत असल्याची माहिती आहे. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी खासदार राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत यांनी शिवसेना-मनसे यांच्या संयुक्त मोर्चावर भाष्य केले. ते म्हणाले की, ठाण्यातला मनसे आणि शिवसेनेच्या मोर्चाच कारण स्पष्ट आहे, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात त्या महापालिका हद्दीत जे दंगेखोर, दरोडेखोर, भ्रष्टाचारी, जी लाचलूचपट सुरू आहे त्या विरुद्ध हा मोर्चा आहे. महापालिकेच्या ज्या उपायुक्त वर एसीबीने कारवाई केली ते मिंधे पक्षाचे हस्तक होते. मी मुख्यमंत्र्यांच अभिनंदन करतो त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरी विरोधात मोहीम सुरू केली आणि कोणाचाही मुलायजा न ठेवता, कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करतात त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या गुंडगिरी विरोधात देण गरजेचे आहे गणेश नाईक यांनी सुद्धा या रावण राज विरोधात आवाज उठवला, मी त्यांचंही अभिनंदन करील की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी त्यांनी जनता दरबार सुरू केला, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी टीका केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करुन घेण्याच्या चर्चा सुरु आहे. याबाबत देखील खासदार राऊत म्हणाले की, स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे, कि आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेण गरजेचे आहे, त्यांची ही भूमिका आहे निर्णय नाही, असे देखील मत खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेवेळी मांडले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाची भूमिका मांडत असतात. आज देखील त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य करत पत्रकार परिषद घेतली. मात्र यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. खासदार संजय राऊत यांना फोर्टीज हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. मात्र अद्याप त्यांची प्रकृती का खराब झाली याचें कारण समोर आलेले नाही. यानंतर आता डॉक्टर खासदार संजय राऊत त्यांच्या प्रकृतीबाबत काय माहिती देतात. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. खासदार संजय राऊत रूटिन चेकअपसाठी दाखल झाले असल्याची माहिती देखील समोर येत आहे.