
MP Sanjay Raut criticizes Ravindra Chavan's lungi look in shivtirtha mahayuti sabha
भाजप महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या शिवतीर्थावरील सभेमध्ये लुंगी स्टाईल केली होती. त्यांनी गोल्डन बॉर्डर असलेली लुंगी घातली होती. मात्र मुंबईच्या सभेमध्ये साऊथ इंडियन लुंगी घातल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी जोरदार टीका केली असून महाराष्ट्रामध्ये लुंगी चालणार नाही, अशी आक्रमक भूमिका देखील घेतली आहे.
हे देखील वाचा : ठाकरेंच्या युतीचा फटका सर्वात जास्त राज ठाकरेंना…! देवेंद्र फडणवीसांनी सांगितली राजनीती
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर देखील रवींद्र चव्हाणांचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत भाजप नेते अण्णा मलई यांच्या वक्तव्यावरुन निशाणा साधला आहे. खासदार राऊत यांनी लिहिले आहे की, रसमलाई इफ़ेक्ट (अण्णा मलई) रवींद्र चव्हाण दाक्षिणात्य पद्धतीची लुंगी नेसून महायुतीच्या सभेत आले (म्हणे गुडघ्याला मार लागलाय म्हणून लुंगी ;मग मोकळा ढाकला मराठी लेंगा घालता आला असता) काय बोलायचे यांना? असा खोचक टोला खासदार राऊतांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : १५ जानेवारीला मतदान; वेळ, मतदान प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सर्व माहिती, वाचा एका क्लिकवर
प्रचारामध्ये ठाकरे बंधू आणि भाजपचे नेते अण्णा मलई यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. अण्णा मलई यांनी मुंबईमध्ये येऊन बॉम्बे हे फक्त महाराष्ट्राचे शहर नाही असे वक्तव्य केले. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सडेतोड उत्तर देत प्रचार सभेवेळी अण्णामलाई यांचा उल्लेख रसमलाई असा केला. तसेच त्यांना मुंबईच्या मुद्द्यांवर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल उपस्थित केला होता. त्याला आता अण्णामलाई यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. आपल्यावर टीका करणारे ठाकरे बंधू मूर्ख आहेत, त्यांना मूलभूत समज नाही असं अण्णामलाई म्हणाले. आपल्याला मुंबईत येण्यापासून कुणी रोखू शकत नाही, आपण मुंबईत येणारच, तुम्हाला काय करायचं ते करा असं जाहीर आव्हानही दिलं आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबई शहर महाराष्ट्राचं नसल्याचं वक्तव्य केलं होतं. भाजप नेते के अण्णामलाई आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वाद उफाळून आला आहे. यामध्येच रवींद्र चव्हाण यांनी लुंगी घालून आल्याने वादाची ठिणगी पडली आहे.