Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मोदी, शहा व फडणवीस मुंबई गिळण्याचे काम करतील’; खासदार संजय राऊत यांची टीका

छगन भुजबळ यांना मिळालेल्या मंत्रिपदावर बोलताना मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी स्वीकारले आहे. भुजबळ यांचा कुठलाही पक्ष नाही अजित पवार यांनी चोरलेल्या पक्षात ते आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 25, 2025 | 03:08 PM
'मोदी, शहा व फडणवीस मुंबई गिळण्याचे काम करतील'; खासदार संजय राऊत यांची टीका

'मोदी, शहा व फडणवीस मुंबई गिळण्याचे काम करतील'; खासदार संजय राऊत यांची टीका

Follow Us
Close
Follow Us:

नारायणगाव : मुंबई हे मराठी माणसाचं हृदय आहे. या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि मुंबई गिळण्याचे काम मोदी, शहा, फडणवीस भविष्यात करतील अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओझर (तालुका जुन्नर) येथे केली. मुंबईसह महाराष्ट्रातील समस्त मराठी माणूस गट-तट विसरून दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला तर ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल, अशी जळजळीत प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.

शिवसेना जुन्नर तालुका पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यापूर्वी तसेच जुन्नर तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त ते जुन्नर तालुक्यात आले होते. त्यावेळी ओझर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील का? या प्रश्नावर त्यांनी मराठी माणसाच्या भवितव्यासाठी एकत्र आले तर चांगलंच आहे, असे स्पष्टीकरण दिले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे जाहीर केल्यामुळे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना-पदाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करण्यासाठी दौरे चालू असल्याचे सांगताना लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत महाविकास आघाडी एकत्रित मिळून लढण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भुजबळ यांचा कुठलाही पक्ष नाही, ते अजित पवारांच्या चोरलेल्या पक्षात 

छगन भुजबळ यांना मिळालेल्या मंत्रिपदावर बोलताना मोदी, शहा व देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी स्वीकारले आहे. भुजबळ यांचा कुठलाही पक्ष नाही अजित पवार यांनी चोरलेल्या पक्षात ते आहेत. भाजपशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने कितीही मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होणार, भाजप गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून एकापेक्षा जास्त म्हणजे चार मुख्यमंत्री सुद्धा करू शकतात, असाही टोला त्यांनी लगावला.

Web Title: Mp sanjay raut criticizes on pm modi amit shah and devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!
1

Anjali Damania on Kharat: भोंदू खरातचे राजकीय सिंडिकेट? चाकणकर, शिंदे, तटकरे अन् पाटील; अंजली दमानियांची धक्कादायक यादी!

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर
2

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप
3

Satara Politics: सातारकरांचा वारसा ‘इतिहासजमा’; कस्तुरबा रुग्णालय इमारत पाडल्याने संताप

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.