
MP Sanjay Raut Press Confernce live after Nagarparishad Nagarpanchayat Election Result 2025
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपने आणि महायुतीने मतदारांना पैशांचे वाटप केले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “विधानसभेचे आपण निकाल पाहिले असतील तर तेच निकाल आहेत. मशीन तशीच सेट आहे. 120 ते 125 हे भाजपला मिळणार हे ठरलेलं असतं. करेक्ट शिंदे गट 54 विधानसभा आणि यावेळी सुद्धा. आणि 40-42 अजित पवारांना हे ठरलेलं आहे. तेच सेटिंग कायम आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. आकड्यांमध्ये अजिबात बदल झालेला नाही. भाजपने त्याच पद्धतीने मशीन सेट केली आहे,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी
खासदार संजय राऊत म्हणाले की, पैशांची जी गारपीठ झाली. त्यापुढे कोण टिकणार? आम्ही उगवलेली पिके देखील त्याखाली झुकल्या गेली. 30 कोटी बजेट असलेल्या नगर पालिकेवर भाजप आणि शिंंदे गट 150-150 कोटी रुपये जिंकण्यासाठी खर्च करतात. नगर पंचायतीच्या प्रचाराला आम्ही कधी चार्टर्ड फाईल्स आणि हेलिकॉप्टर वापरले नव्हते. आम्ही या निवडणूका कार्यकर्त्यांवर सोडल्या. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षांमध्ये होती. सत्तेतील तीन पक्ष एकमेकांविरोधात खेळत राहिले. त्यामुळे पैशांचा प्रचंड धुराळा उडाला, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये जागावाटपाची चर्चा संपली
मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत जोरदार आणि अंतिम टप्प्यामध्ये चर्चा आली आहे. मात्र ठाकरे बंधू युती कधी जाहीर करणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. याबाबत माहिती देताना खासदार राऊत म्हणाले की, “ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा संपली आहे आणि जागावाटप सुद्धा संपले आहे. कोणी कुठे लढायचं आहे याबाबत एकमत झालं आहे. यामध्ये कोणतीही अडचण दिसत नाही. ज्या अडचणी होत्या त्या ठाकरे बंधूंनी लक्ष घालून दूर केल्या आहेत. युतीमध्ये काही गोष्टी कटुतीने सोडव्याच्या असतात. पण सर्व कार्यकर्त्यांचे समाधान होईल असे जागावाटप झाले आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये या संदर्भात रितसर घोषणा होईल,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : बीडमध्ये मुंडे गढ राखणार की सोनावणे बाजी मारणार? मुंडे भावा-बहिणीची प्रतिष्ठा पणाला