Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपण कशाला मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांनी काढून घेतले अंग

खासदार संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे देखील म्हटले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2026 | 01:18 PM
MP Sanjay Raut press confernce on two ncp merge together political News

MP Sanjay Raut press confernce on two ncp merge together political News

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत पत्रकार परिषद
  • राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया
  • हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय – राऊत
Sanjay Raut Live : मुंबई : दिवंगत नेते अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये जोरदार राजकारण तापले आहे. अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पक्षाचे काय होणार आणि राष्ट्रवादी पक्षाचे (NCP Politics) विलिनीकरण होणार का आणि नेतृत्व कोण करणार यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. विलिनीकरणाच्या चर्चा अजित पवार करत असल्याचा दावा एक गट करत आहे तर या नुसत्या चर्चा आहेत असा एका गटाचा दावा आहे. याबाबत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर खासदार संजय राऊत यांनी अनेकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत आणि अजित पवारांच्या निधनावर संशय व्यक्त केला आहे. यावरुन त्यांच्यावर अनेकांनी टीका देखील केली. यानंतर आता खासदार राऊत यांनी “विलिनीकरणाचा विषय त्यांच्यावर सोडाना आणि यात शिवसेनेचा काय संबंध अशी भूमिका घेतली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “ राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय त्यांच्यावर सोडा ना. आपण कशाला त्यात मध्ये पडायचं? यात शिवसेनेचा काय संबंध? हा त्यांचा विषय असेल तर त्यांनी त्यातून मार्ग काढावा किंवा निर्णय घ्यावा. प्रत्येकवेळी तुम्ही इतर पक्षाच्या नेत्यांना विचारणार,” असे मत खासदार राऊतांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार यांच्याकडेच असतील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे; येत्या 9 फेब्रुवारीला…

पुढे ते म्हणाले की, “विलिनीकरण हा त्यांचा विषय आहे. पण सध्या सुनील तटकरे हे शरद पवारांना मार्गदर्शन करतायत हे फार इंटरेस्टिंग आहे. अजित पवार यांच्या दु:खद निधनानंतर या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जोरात सुरु झालं. विशेषत: अजित पवार गटाकडून. ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं. पद आणि प्रतिष्ठा दिली. ताकद दिली. ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करु नये असे सल्ले देतायत. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे,” असा टोला खासदार राऊतांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : तत्परतेने टोल वसुली, सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय; राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीवरुन जोरदार झापलं

शरद पवार यांनी काटेवाडीतील घरी भेट दिला आहे. तसेच यावरुन राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु असताना यावर संजय राऊत म्हणाले की, “सुनेत्रा ताईंनी त्यांचा पती गमावला आहे. शरद पवार यांनी फक्त पुतण्या नाही तर मुलासारख्या अजित पवारांना गमावलं आहे. शरद पवार त्यांच्या सूनबाईच्या घरी गेले असतील, तेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचाराव असं काही नाही. शरद पवार साहेब अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आमचा विषय इंडिया ब्लॉकशी, महाविकास आघाडीशी संबंधित आहे. शरद पवारांचा पक्ष मविआ आणि इंडिया ब्लॉगचा सदस्य आहे. एक गट म्हणतो चर्चा झाली, एक म्हणतो चर्चा झाली नाही. यात विश्वास कोणावर ठेवायचा” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Web Title: Mp sanjay raut press confernce on two ncp merge together political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • NCP Politics
  • sanjay raut
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
1

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
2

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.