Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : संजय राऊत हे शरद पवारांचे दलाल…! भाजप नेते नवनाथ बन यांचा जोरदार घणाघात

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी खासदार राऊतांवर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर देखील भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 06:17 PM
Sanjay Raut targets bjp and cm devendra fadnavis over tipu sultan controversy

Sanjay Raut targets bjp and cm devendra fadnavis over tipu sultan controversy

Follow Us
Follow Us:
  • भाजप नेते नवनाथ बन यांनी राऊतांवर निशाणा साधला
  • राऊत प्रत्येक पक्षाच्या कारभारात नाक खुपसायचे काम
  • राष्ट्रवादी विलीनीकरणामधील डोम कावळ्यांपैकी एक राऊत
Maharashtra Politics : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वाद निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी निधनावर अनेक आरोप आणि संशय व्यक्त केला. यानंतर भाजप नेत्यांनी खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन म्हणाले की, “संजय राऊत हे अधिकृतपणे उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून भाजपावर उठसूठ बिनबुडाची टीका करत असतात. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यांमुळे ते शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत की काँग्रेस आणि डाव्या आघाडीचे प्रवक्ते आहेत हा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचे उत्तर राऊतांनी द्यावे,” असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे (BJP Politics) माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवारी दिले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी खासदार राऊतांवर निशाणा साधला. शरद पवारांचे दलाल आणि मुखिया म्हणून राऊतांची नियुक्ती झाली आहे का असा सवालही बन यांनी उपस्थित केला. ते  म्हणाले की, “राऊत उबाठा गटाचे खासदार, प्रवक्ते म्हणून मिरवतात. मात्र प्रत्यक्षात ते राजकीय भूमिका शरद पवारांच्या हिताची घेतात. उबाठा गटाचे प्रवक्ते असताना प्रत्येक पक्षाच्या कारभारात नाक खुपसायचे काम राऊतांनी तात्काळ बंद करावे.  प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे बघण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. अजितदादा यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल महाराष्ट्राला पटेल अशी समतोल भूमिका घेत आहेत,” असे देखील बन म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल

तसेच “राऊतांचे दोन पाय शरद पवार राष्ट्रवादीमध्ये, हात काँग्रेसमध्ये आहेत अशा स्थितीत उबाठा गटामध्ये राऊतांचे डोके तरी आहे का ? की डाव्या आघाडीकडे डोके गहाण ठेवले आहे असा बोचरा सवाल नवनाथ बन यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संगमा, तारीक अन्वर, अरुण गुजराती यांनी पक्षहितासाठी प्रामाणिकपणे काम केले. आज अचानक ‘पटेल’ या नावावर आक्षेप घेत राऊत राजकारण करत आहेत,” असा टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा :  लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”

राष्ट्रवादीचा ताबा घेण्यासाठी टपून बसलेला डोम कावळा

पुढे नवनाथ बन म्हणाले की, “अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी काही डोमकावळे टपून बसले आहेत. त्या डोम कावळ्यांपैकी एक राऊत आहेत. अशा डोम कावळ्यांपासून राष्ट्रवादी पक्षाने सावध राहण्याची गरज आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, दोन्ही कुटुंबे एकत्र येणार असतील, तर भाजपाचा त्याला विरोध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करायचे की नाही, हा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घ्यायचा आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. महापालिकांमध्ये उबाठा गटाला एकही जागा मिळालेली नसून, पक्षाचे संघटन देखील अस्तित्वात राहिलेले नाही. तसेच कर्जत-जामखेडमध्ये जनतेने रोहित पवारांना नाकारले होते. निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वापर केला नसता, तर त्यांचा पराभव निश्चित होता,” असा आरोपही नवनाथ बन यांनी केला आहे.

Web Title: Bjp navnath ban criticizes mp sanjay raut over the ncp partys merger political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल
1

Nashik Potholes: नाशिकमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! ‘मनपावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’; संजय राऊतांचा प्रशासनावर हल्लाबोल

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
2

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट
3

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का?  ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज
4

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का? ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.