MP Sanjay Raut suggest PM Narendra Modi retirement on rss mohan Bhagwat 75 age statement
Sanjay Raut on PM Narendra Modi retirement : मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यावरुन चर्चेमध्ये असतात. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच रिटायरमेंट घेणार असल्याचे ते म्हणाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नियमांची आठवण करुन देत आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा दाखला देत खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.
एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी रिटायरमेंटच्या वयाबाबत वक्तव्य केले होते. पच्चाहत्तरची शाल अंगावर आली की थांबायचं असतं असे सूचक विधान केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील वय आता 75 होणार आहे. यामुळे मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरुन खासदार संजय राऊत यांनी गंभीर दावा केला आहे. मोहन भागवत हे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या रिटायरमेंटची जाणीव करुन देत असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार राऊत म्हणाले की, आपल्याला आठवत असेल मी या संदर्भात एक रोखठोक लिहिलेल होत, नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम, आणि संघाचे सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ही चर्चा साधारण त्याचा सारांश मी दाखवला. त्यांच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्वतःच नियम केला, संघाने नियम केला 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी. सत्तेच्या पदावरून नरेंद्र मोदी यांनी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी आपल्या मार्ग मोकळे करण्यासाठी लादली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, “आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत त्यांची दाढी पिकली आहे. त्यांची डोक्यावरची केसही उडाले आहेत. जगभ्रमण करून झाले आहे. सर्व सुख त्यांनी भोगली आहेत. आता जो नियम आपण केला आहे 75 वर्ष नंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना सूचना देत आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपावा लागेल,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या निवृत्तीबाबत देखील वक्तव्य केले आहे. अमित शाह यांनी देखील या संदर्भात वक्तव्य केले होते. खासदार राऊत म्हणाले की, “हा त्यांचा प्रश्न कोणी काय करायचा, निवृत्तीनंतर जीवनात अनेक चांगल्या गोष्टी करायला येतात जसे आमचे नानाजी देशमुख होते संघाचे त्याने उत्तम प्रकारचे कार्य केले. अनेक जण आपापल्या भागात सामाजिक आणि इतर काम करत असतात. त्याच्यापेक्षा आपल्याला कोण काय करणार त्याविषयी चर्चा करण्याचा कारण नाही. किंबहुना या दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.