mp sanjay raut target ajit pawar and eknath shinde by giving political Nag Panchami wishes
Sanjay Raut Nagpanchmi Wish : मुंबई : राज्यामध्ये नागपंचमी सणाचा मोठा उत्साह आहे. आजच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. स्त्रीया मोठ्या भक्ती भावाने नागाला पुजण्यासाठी जातात. सुवासीन स्त्री ही इतर बायकांसह फेर धरायला आणि झोका खेळण्यासाठी जात असते. काळानुरुप याचे प्रमाण कमी झाले असले तरी अनेक ठिकाणी आजही नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दरम्यान, राजकीय वर्तुळामध्ये देखील नागपंचमीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांनी राजकारण्यातील काही नेत्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्यातील राजकीय नेत्यांना टोला लगावून नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, मिंधे आणि अजित गटातील सगळ्यांना नागपंचमीच्या विशेष शुभेच्छा!, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे,
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहिल्यानंतर खाली राज्यातील नेत्यांना टॅग देखील केले आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे स्त्रियांसह राजकीय नेत्यांमध्ये देखील नागपंचमी सणाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.
राज्याच्या राजकारणाची उलथा पालथ
मागील दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शिवसेना पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह गुवाहटी गाठून शिवसेनेमध्ये बंड पुकारले. यानंतर पक्ष, चिन्ह आणि नावावर देखील दावा केला. याच पद्धतीने अजित पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवत बंडखोरी केली. अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होत महायुतीच्या सत्तेमध्ये सामील झाले. यामुळे राज्याचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना नागपंचमीच्या शुभेच्छा देत राजकीय टोला लगावला आहे.
मिंधे आणि अजित गटातील सगळ्यांना नागपंचमीच्या विशेष शुभेच्छा!
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis pic.twitter.com/Rnqsn6mSDl— Sanjay Raut (@rautsanjay61) July 29, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ खडसे आक्रमक
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हे कथित रेव्ह पार्टीमध्ये रंगेहात पकडले गेले आहेत. एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांच्या जावयाला केलेल्या अटकेवर संशय व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, “पोलिसांच्या कारभाराविषयी माझ्या मनात काही प्रश्न आहेत. जे माध्यमांमधून मला उपस्थित करायचे आहेत. तिथे पाच-सात जणांची पार्टी चालू होती. तिथं कुठलंही संगीत नाही, नृत्य नाही, कुठलाही गोंधळ नाही. एका घरात पाच-सात जण पार्टी करत होते, त्याला तुम्ही रेव्ह पार्टी कसं काय म्हणता? असं असेल तर देशात, राज्यात कुठेही पाच-सात जण मिळून पार्टी करत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणार का? रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय ती पोलिसांनी स्पष्ट करावी. त्यामुळे रेव्ह पार्टी आयोजित केली म्हणून माझ्या जावयाची बदनामी करण्याचं प्रयोजन काय?” अशी प्रश्नांची सरबत्ती एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली.