धुळ्यात उद्योग विस्तारासाठी 'लॉजिस्टिक हब' उभारणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी ही पर्यायी तिसरी भाषा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंबंधित शासन निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. ठाकरे बंधू यांनी एकत्रितपणे मोर्चा देखील घोषित केला होता. मात्र यासंबंधित दोन्ही शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्रित विजयी सभा घेण्याचे ठरवले आहे. यावरुन भाजपने जोरदार टीका केली आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रित विजयी सभेच्या तयारीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “दोन्ही बाजूने पूर्ण तयारी सुरू आहे. आता या क्षणी आमचे सहकारी आणि मनसेचे नेते जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे तिथे पाहणी करणार आहेत. पुढल्या दोन दिवसांत ग्राउंड मॅनेजमेंट म्हणतात त्याबद्दल तयारी चालू आणि आमंत्रण आम्ही दिले आहे. कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही. काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोघांनी एकत्रित आवाहन केले आहे, तुम्ही याच्यात सामील व्हा. कारण हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय मराठी माणूस एकत्र येणार या भीतीने तो मागे घेतला. त्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा,” असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “राजकीय पक्ष, जात, धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांनी उपस्थित राहावे, अशी आमची भूमिका आहे. हा राजकीय मेळावा नाही, काल रात्री माझं मनसे प्रमुख यांच्याशी बोलणं झालं. शिवसेनाप्रमुख यांच्याशी माझी चर्चा झाली. हा राजकीय मेळावा नाही. आशिष शेलार यांना काय म्हणायचं आहे म्हणू द्या. हा मोर्चा सगळ्यांचा होता म्हणून तुम्ही माघार घेतली. ठाकरे एकच आहे. तुम्ही वेगळे करण्याचा प्रयत्न करता आले, केला आहे, ही तुमच्या मनातली भीती आहे. गर्दी काय असते हे दोन्ही ठाकरेंनी वेळोवेळी दाखवले आहे. भारतीय जनता पक्षाने पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पैसा, दहशत, सीबीआय, ईडी दाखवून तुम्ही मोडली,” असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शाळांमधील भाषेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी नवीन समिती स्थापन करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “समिती ठराव ठराव ठराव करणे डराव डराव करणे हा फडणवीस यांचा आवडता छंद आहे. नरेंद्र जाधव हे एक अर्थतज्ञ नक्कीच आहेत. एक वेगळीच समिती स्थापन करण्यात आली असते पण त्याची आता गरज नाही. कोणत्याही प्रकारे आम्ही ती भाषा स्वीकारणार नाही. त्रिभाषा सूत्र हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील ठरवलेलं आहे. ही वेळ वाया घालवणारी व्यवस्था आहे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.