Shiv Sena Thackeray faction MP Sanjay Raut targets BJP's Chandrashekhar Bawankule
मुंंबई : महाराष्ट्रामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाण्यातील नागरे या शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बुलढाण्यातील राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कैलास नागरे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी देखील निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले की, “ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे सरकार बोलत आहे घोषणा करत आहे. पण प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती काय आहे? कैलासचे तुम्ही जे नाव घेतलं त्याच्याविषयी मला माहिती आणि मला वाटल या राज्याची परिस्थिती आणि हे राज्य प्रगतीपथावर आहे असं तुम्ही म्हणत आहात हे राज्य प्रगतीपथावर नसून हे राजी अधोगतीला लागलं आहे. महाराष्ट्रात रोज आणि देशात रोज 22 शेतकरी आत्महत्या करतात या देशाची राज्याचे परिस्थिती आहे. नरेंद्र मोदी गंगाजल कुंभ घेऊन जगभरात फिरत आहेत आज मॉरिशस , नेपाळ परवा म्यानमार फिरत आहेत आणि किसान मरत आहेत,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकावी अशी मागणी राजकीय वर्तुळातून केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. यावरुन खासदार राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “औरंगजेब याला गाडल्यावर चारशे वर्ष झाली विसरून जावा. शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत. ते औरंगजेबमुळे आत्महत्या करत आहेत का? तो तुमच्यामुळे आत्महत्या करत आहे. औरंगजेबने अन्याय आणि अत्याचार केला असेल तर तुम्ही लोकं काय करत आहात? शेतकरी मरत आहे. किसान बेरोजगार आणि महिला देखील आत्महत्या करत आहेत. औरंगजेब यांच्या कार्यकाळ झाला आहे ते झालं पण तुमच्या कार्यकाळ हा औरंगजेबापेक्षा देखील खूप खराब आहे,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकारणी व्यक्ती होळी खेळण्यावर देखील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “अनेक वर्ष होळी हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. पूर्वी दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असे प्रमुख नेते यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असतात. पण गेल्या काळी काळापासून ही प्रथा बंद झाली. आम्ही फार संकुचित होत आहोत आणि हा संकुचित पणा या देशाला आणि आपल्या समाजाला आले हिंदू धर्मालाही परवडणारा नाही. आमची प्रतिमा जगभरात लिवरल सहिष्णू अशी आहे म्हणून हिंदू धर्माला जगामध्ये मान आहे. आमच्या धर्माचा रक्षण करून आम्ही आमच्या सांस्कृतिक सर्वांना सामावून घेतो दुर्दैवाने गेल्या दहा वर्षात मोकळेपणा आमच्या संस्कृतीला संपला नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांत होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो. होळी हा सर्वांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा सुखदुःखामध्ये एकत्र येण्याचा सण आहे उत्सव आहे. आज देशांमध्ये काय चालू आहे महाराष्ट्रात काय चालू आहे कुठे मशिदीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसऱ्या बाजूला ठीक आहे हे सुद्धा दिवस निघून जातील,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.