Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”

लोकांना शिवसेनेबदद्ल वेगळा विश्वास वाटतोय. एकनाथ शिंदे बद्दल विश्वास वाटतोय. शेतकऱ्याचा मुलगा, एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हे केवळ आपल्या आशीर्वादाने झाले, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 07:09 PM
Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, "लाडक्या बहिणींनी विरोधकांचे..."

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, "लाडक्या बहिणींनी विरोधकांचे..."

Follow Us
Close
Follow Us:

शिवसेनेच्या उमेदवारांसाठी श्रीकांत शिंदेंचा प्रचाराचा धडाका 
राज्यात 2 तारखेला होणार नगरपरिषद, नगरपंचायतसाठी मतदान
परतूर, अंबडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- शिंदे 

परतूर/जालना:  परतूर आणि अंबडमध्ये मागील अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांची सत्ता होती, मात्र येथे अनेक समस्या आहेत. राज्यात विकास कामे होत आहेत मात्र परतूर विकासापासून दूर आहे. परतूर आणि अंबडमध्ये शिवसेनेला सत्ता दिल्यास येथे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.

जालना जिल्ह्यातील परतूर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मंत्री संजय शिरसाट, शिवसेना नेते अर्जुन खोतकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार हिकमत उढाण संपर्क प्रमुख भास्कर आंबेकर, पंडितराव भुदेकर, अभिमन्यू खोतकर आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महायुती तुटली…! ‘दोघांच्या भांडणामुळे धाराशिव शहराचे झाले वाटोळे, जनता तिसऱ्या पर्यायाचा शोधात’, सुधीर पाटलांचा आरोप

परतूर नगर परिषदेसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रेणुका हिवाळे आणि अंबड नगराध्यक्षपदासाठी सना पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खासदार ड़ॉ. शिंदे म्हणाले की. महाराष्ट्रात लाडक्या बहिणीची वेगळी ताकद निर्माण झाली आहे. या लाडक्या बहिणींनी क्रांती करून दाखवली. या लाडक्या बहिणींचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेनेकडून परतूर आणि अंबडसाठी लाडक्या बहिणींना उमेदवारी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीला लोकसभेत ३१ जागा आल्या, त्यामुळे मवीआने विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळ जाहीर केलं होतं. मात्र लाडक्या बहिणीने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकले, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

राज्यात महायुती सरकारने लाडकी बहिण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या. परतूरसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी ५० कोटींचा विकास निधी देण्यात आला. लोकांना शिवसेनेबदद्ल वेगळा विश्वास वाटतोय. एकनाथ शिंदे बद्दल विश्वास वाटतोय. शेतकऱ्याचा मुलगा, एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री हे केवळ आपल्या आशीर्वादाने झाले. शिंदे साहेब आश्वासने देत नाही तर दिलेला शब्द पूर्ण करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे. मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला सर्वांसाठी खुला होता.

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

शेवटचा व्यक्ती भेटून जाईपर्यंत शिंदे साहेब झोपत नव्हते. शिवसेनेकडून जातीपातीचे राजकारण केले जात नाही. परतूरसाठी काही नसताना निधी येतो, नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले तर किती मोठा निधी मिळेल, याचा मतदारांनी विचार करावा, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. परतूर आणि अंबडच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. मतदानापूर्वी अगोदर मतासाठी पैसे देणारे खूप येतील, आपलं मत खूप बहुमोल आहे. मतदान करताना योग्य विचार करून केलं पाहिजे. ज्याप्रमाणे विधानसभेला महायुतीत मतदान केले त्याप्रमाणे तुम्ही शिवसेनेला देखील मतदान केले पाहिजे, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांना केले.

Web Title: Mp shrikant shinde stateement partur jalna ladki bahin yojana local body election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 07:09 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Local Body Election
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण; निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण
1

केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण; निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण

वसमतची ‘विकास’ फसवणूक; कोट्यवधी खर्च, ठेकेदारांचे वैभव वाढले, शहर मात्र खड्ड्यात
2

वसमतची ‘विकास’ फसवणूक; कोट्यवधी खर्च, ठेकेदारांचे वैभव वाढले, शहर मात्र खड्ड्यात

Maharashtra Politics: “हे सर्वसामान्यांचे नेतृत्व, भ्रष्टाचाऱ्यांना…”; श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर घणाघात
3

Maharashtra Politics: “हे सर्वसामान्यांचे नेतृत्व, भ्रष्टाचाऱ्यांना…”; श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर घणाघात

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा कडाडल्या! धर्म अन् अयोध्येवर टीका करणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
4

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा कडाडल्या! धर्म अन् अयोध्येवर टीका करणाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.