महायुती तुटली...! 'दोघांच्या भांडणामुळे धाराशिव शहराचे झाले वाटोळे, जनता तिसऱ्या पर्यायाचा शोधात', सुधीर पाटलांचा आरोप
महायुतीत शिवसेनेला किरकोळ लेखून अपमानास्पद जागा दिल्याने आम्ही २१ जागांवर स्वतंत्रपणे लढत आहोत. मी स्वतः दहा आणि जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी अकरा जागा निवडून आणण्याची जबाबदारी घेतली असून कुठल्याही परिस्थितीत या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही तण मन धनाने प्रयत्न करून या जागा निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजपा सोबत आम्ही शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र इलेक्टिव्ह मेरिटचे कारण पुढे करत आमची किरकोळ जागांवर बोळवण करण्याची नीती भाजपाने आखली होती. या बैठकीस फक्त पाच मिनिटांचा वेळ आम्हाला देण्यात आला होता. ही अपमानास्पद वागणूक सहन न झाल्याने आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक संपर्क प्रमुख आमदार राजन साळवी यांनीही आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून शिवसेना काय आहे. हे येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ. असा इशारा सुधीर पाटील यांनी दिला आहे.
तसेच भाजप शिवसेनेत धाराशिवमध्येही तणाव पाहायला मिळत आहेत. युती फीस्कटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात आली आहे. आम्हाला अंधारात ठेवायचं आणि यूती तोडायची हे भाजपचे प्लॅनिंग होतं. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना आपण काहीही करू शकतो. आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतं. मात्र ही निवडणूक कोणाची ताकद किती आहे दाखवण्याचे आहे. शिवसेना ताकद दाखवणार असा आव्हान जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची शिवसेनेची बैठक घेत त्यांनी निवडणूक रणनीती आखली. लाडक्या बहिणी योजनेचे जनक एकनाथ शिंदे आहेत. त्यामूळे लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत एकनाथ शिंदे यांचा मोठा चेहरा आमच्याकडे त्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाला कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्यास ते म्हणाले.






