mp supriya sule target mahayuti government over developmental projects in pune
बीड : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आलेली असून सातवा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. तरी देखील सातवा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार असून पोलिसांना त्याला पकडण्यामध्ये यश आलेले नाही. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी बीडमध्ये देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग गावामध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. बीडमध्ये राजकारण रंगले असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहे. खासदार सुळे यावेळी म्हणाल्या की, “आम्हाला धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही पाहिजे, त्या न्याय प्रक्रियेत कोणी कोणाला लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला दूर केले पाहिजे हा आमचा आग्रह आहे,” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे त्या म्हणाल्या की, “मी आश्वासन देण्यासाठी नाही आधार साथ देण्यासाठी इथे आले. माणुसकीच्या नात्याने आम्ही या कुटुंबात सोबत उभे आहोत. महाराष्ट्रात कुठल्याही कुटुंबावर अन्याय झाला तर ताकदीने त्यांच्याबरोबर उभे राहू. या हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. पहिला मुद्दा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टातून झाली पाहिजे. खंडणी ज्याने मागितली किंवा ज्यांनी त्यांना मदत केली अशा सर्वांची चौकशी करून त्यांना ईडी सीबीआय लागले पाहिजे. महाराष्ट्रासमोर सत्य आले पाहिजे. फरार असलेले कृष्णा आंधळे सापडलेच पाहिजेत, असं कसं शक्य होईल माणूस नुसता गायब झाला,” असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
खासदार सुप्रिया सुळे यांना शिवसेनेतील नाराजीवर प्रश्न करण्यात आला. यावर त्या आम्हाला त्याबद्दल काही नाहिती नाही असे मत व्यक्त केले आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी कालच विनंती केली आहे. वेळ मिळाली की त्यांच्याशी बोलेल. परवा मी पण गडकरी साहेबांकडे गेले होते. त्या आधी मी अश्विनी वैष्णव यांना तीन वेळा भेटले. त्याच्यानंतर मी भूपेंद्र यादव यांना देखील भेटून आले. आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत, सशक्त लोकशाहीमध्ये संवाद असलाच पाहिजे,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.