आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार
मुंबई : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. डिसेंबरमध्ये झालेल्या या हत्येमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे. या सांत्वनपर भेटीमध्ये खासदार सुळेंबरोबरच आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनावणे उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बीडवरील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मस्साजोग ग्रामस्थांचा आवाज कोणीही ऐकला नाही हे सरकार मूकबधिर झाले आहे या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी वाचवायचे आहे यांचा तो जुना मित्रपरिवार आहे. भाजप युवा मोर्चा मधला त्यांच्या सहकार्याला वाचवायचे आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला पाहिजे. आमच्या काळामध्ये मनोहर जोशींचा सरकार असताना नैतिकतेच्या मुद्द्यावर तीन मंत्र्यांचा राजीनामा घेतला. नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला ते आता त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महायुतीच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या आमदार व खासदार यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. यावरुन खासदार राऊत यांनी टोला लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, ज्यांनी या राज्यात वाय झेड करून टाकली आहे हे वेड्यांचे सरकार आहे. हे मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे. मंत्रालयात गोंधळ आहे. राज्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहेत गृहनिर्माण खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. म्हाडा मध्ये अधिकाऱ्याची नेमणूक संबंधित मंत्र्यांना रोकडे देऊन केली जाते. लवकरच कोणत्या प्रकल्पासाठी किती पैसे दिले गेले याची माहिती मी उघड करेन, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं आहे फडणवीस यांचे आदेश पाळू नका अशा प्रकारचं आवाहन एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये निर्माण झालं होतं. आता मंत्रालयात सुद्धा अंडरवर्ल्ड सुरू आहे समांतर सरकार सुरू आहे प्रति सरकार सुरू असेल तर मंत्रालयात राजकीय अराजक निर्माण झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य अराजकतेच्या खालीच ढकललं जाईल. 56 ते 57 आमदार ईव्हीएम ताकदीवर निवडून आले भाजपने ते आता सरकारला आव्हान देत आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.