'लाडक्या बहिणींनी अर्थसंकल्प गिळला'; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटातील अनेक नेतेमंडळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहे. त्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे काही, आजी-माजी आमदार, खासदार फुटून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षातील गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार-खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.
ठाकरे गटाच्या खासदारांची 20 फेब्रुवारीला तर आमदारांची 25 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभेचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक बोलवण्यात आल्याची चर्चा आहे. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चितीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उदय सामंत यांच्या दाव्यानंतर सावध पावले
ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील 10 ते 12 माजी आमदार देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. येत्या काळात पक्षप्रवेश पार पडतील, असे वक्तव्यही सामंत यांनी केले आहे. ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे राजन साळवी यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता पक्षाला आणखी काही धक्के बसू नयेत यासाठी उद्धव ठाकरे ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहेत, त्यांनी आत डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अनेक नेतेमंडळींचा होतोय शिवसेनेत प्रवेश
महायुतीचे मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर सुरु झाल्याचे सांगत लवकरच शिवसेना शिंदे गटात माजी आमदार व खासदारांचे प्रवेश होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, ठाकरेंना धक्का देत शिवसेना शिंदे गटात अनेकजण पक्षप्रवेश करत आहेत. कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा एक निष्ठावंत चेहरा असलेले राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतला. तर आमदार भास्कर जाधव हे त्याच पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोकणातून ठाकरेंची शिवसेना धोक्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहात सुरू असतानाच, माजी आमदार वैभव नाईक हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले होते. वैभव नाईक यांच्या मागणीवरून काही दिवसांपूर्वी एसीबीची चौकशी सुरू झाली आहे. पण कोकणातील अनेक अधिकारी ठाकरे गटाची साथ सोडत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या यांच्याशी चर्चा करण्यासाठी वैभव नाईक दाखल झाले होते.