Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supriya Sule : भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट जोडले हात

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त होत आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Jan 26, 2026 | 03:38 PM
MP Supriya Sule upset over announcement of Padma Bhushan award to Bhagat Singh Koshyari

MP Supriya Sule upset over announcement of Padma Bhushan award to Bhagat Singh Koshyari

Follow Us
Close
Follow Us:

Supriya Sule : मुंबई : संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दिल्लीच्या कर्तव्यपथावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील प्रजासत्ताक दिनाचा (Republic Day 2026) उत्साह दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली. समाजातील तळागाळात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, काल (दि.25) 45 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये सर्वात अनपेक्षित असे नाव होते ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य केली आहेत. त्यांनी संत तुकाराम महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन अपमान केला होता. यानंतर देखील अनेकदा वक्तव्यांमुळे चर्चेत राहिलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत माध्यमांनी प्रश्न करताच त्यांनी थेट हात जोडले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही टीका केली आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी थेट हात जोडत राम कृष्ण हरी म्हटलं आहे.

हे देखील वाचा : “मस्ती असेल तर पाकिस्तानात जा..”, पालकमंत्री Sanjay Shirsat यांनी Imtiaz Jaleel यांना सुनावले खडेबोल

नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्याला जाऊन आले आहेत. यामध्ये त्यांनी अनेक करार केले आहेत. मात्र या कंपनी भारतीय असल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सगळ्याच राज्याचे मुख्यमंत्री दावोसला जात असतात. नेमकं आपल्या राज्याच्या पदरी काय पडलं? हे पाहण महत्वाच आहे. कारण मागच्या वर्षी जे करार झाले त्याच पुढे काय झालं? किती गुंतवणूक झाली? किती जणांना नोकऱ्या मिळाल्या? हे पाहण महत्वाच आहे. दावोसला जाण्याबाबत माझी हरकत नाही. मात्र जगात जे सुरू आहे त्यामुळे मला चिंता वाटत आहे. जगातील काही देशांची काय परिस्थिती झाली हे सगळ्यांच्या समोर आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

भगतसिंह कोश्यारी यांना पद्म पुरस्कार मिळाल्याने खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. खासदार राऊत यांनी सोशल मी़डिया पोस्ट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले याच महाशयांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता! महाराष्ट्राचा अपमान करणऱ्यांचा भाजपा सन्मान करते! छान! ” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्या दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

 

 

Web Title: Mp supriya sule upset over announcement of padma bhushan award to bhagat singh koshyari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • Republic Day 2026
  • supriya sule

संबंधित बातम्या

Republic Day Global Celebration : तिरंग्याच्या रंगात न्हाली दुनिया! दुबई ते न्यूझीलंड मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन भारतीय दूतावास
1

Republic Day Global Celebration : तिरंग्याच्या रंगात न्हाली दुनिया! दुबई ते न्यूझीलंड मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन भारतीय दूतावास

Shubhanshu Shukla Ashok Chakra : कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोकचक्र; ठरले पुरस्कार मिळणारे पहिले अंतराळवीर
2

Shubhanshu Shukla Ashok Chakra : कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोकचक्र; ठरले पुरस्कार मिळणारे पहिले अंतराळवीर

Republic Day parade 2026: नागाचे चिन्ह अन् ‘भैरव अदम्य’;  भैरव बटालियनच्या चेहऱ्यावरील रंगामागील गुपित उघड
3

Republic Day parade 2026: नागाचे चिन्ह अन् ‘भैरव अदम्य’; भैरव बटालियनच्या चेहऱ्यावरील रंगामागील गुपित उघड

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली
4

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.