Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या छातीत संसर्ग झाल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 02, 2026 | 05:37 PM
मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत संसर्ग अन्...; रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत संसर्ग अन्...; रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांची प्रकृती बिघडली
  • पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल
  • छातीत संसर्ग
Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुन्हा प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Sharad Pawar Health Update)

सुप्रिया सुळे यांनी दिली प्रकृतीची माहिती

शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या पोस्टनुसार, शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला आहे. त्यासाठी त्यांना पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स घ्यावा लागणार आहे.

MSRTC : ऐन दिवाळीत एसटी बसची चाके थांबणार? कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्यभर घंटानाद, निदर्शने अन् बेमुदत धरणे

डॉक्टरांकडून निवेदन जारी

दरम्यान, शरद पवार यांचे इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ के. ग्रांट यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, शरद पवार यांना छातीत श्वास घेताना वेदना जाणवत असल्याने सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय निरीक्षणासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती लवकरच स्थिर होण्याची अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील रुबी हॉल क्लिनिकमध्ये जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांची प्रकृती सध्या नियंत्रणात असून, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार योग्य दिशेने सुरू असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या दिलासादायक माहिती समोर आली आहे.

Baba has developed chest congestion and will need a 5-day course of antibiotics. Fortunately, all other vital parameters are normal. Thank you all for your good wishes and constant support. A heartfelt thank you to all the doctors from the bottom of my heart. 🙏 — Supriya Sule (@supriya_sule) February 9, 2026

रोहित पवारांची कार्यकर्त्यांना विनंती

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने येत आहेत. मात्र, रुग्णालयात गर्दी होऊ नये आणि उपचारांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाची विनंती केली आहे.

शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊ नये, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयात गर्दी करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. सध्या शरद पवार यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांकडून वेळोवेळी माहिती दिली जात आहे.

Khamgaon Accident: कार अपघातात दोघांचा मृत्यू, अपघातग्रस्त वाहनात आढळला २६ किलो गांजा; टेंभुर्णा येथे ट्रकने दिली धडक

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरद पवार यांना कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे?

    Ans: शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  • Que: शरद पवार यांना नेमका कोणता त्रास झाला आहे?

    Ans: खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू आहे.

  • Que: शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रोहित पवार यांनी काय आवाहन केले?

    Ans: शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्ते पुण्याकडे येत आहेत. मात्र, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊ नये, अशी विनंती केली आहे.

Web Title: Sharad pawar health update admitted ruby hall clinic pune chest infection sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • rohit pawar
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात
1

Baramati News : पावसाच्या संकटाने प्रशासन ॲक्शन मोडमध्ये! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा मैदानात

NCP Politics: राष्ट्रवादीच्या सहा नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; सुनेत्रा पवार-पार्थ पवार अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण
2

NCP Politics: राष्ट्रवादीच्या सहा नेत्यांनी घेतली अमित शाहांची भेट; सुनेत्रा पवार-पार्थ पवार अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण

NCP News : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुनेत्रा पवारांना डावलून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट!
3

NCP News : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? सुनेत्रा पवारांना डावलून बड्या नेत्यांची अमित शाहांशी भेट!

Sharad Pawar News: दिल्लीतील आंदोलनापेक्षा राज्यातील दुष्काळ निवारण आमचे प्राधान्य! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

Sharad Pawar News: दिल्लीतील आंदोलनापेक्षा राज्यातील दुष्काळ निवारण आमचे प्राधान्य! शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.