Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjali Damania News: अहंकार…फक्त आणि फक्त अहंकार! ‘मिसिंग लिंक’च्या भगदाडावरून अंजली दमानियांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर

Anjali Damania- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे," अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर तोफ डागली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 09, 2026 | 12:06 PM
Mumbai Pune Expressway, Missing Link, Devendra Fadnavis, Anjali Damania, Sanjay Raut

Mumbai Pune Expressway, Missing Link, Devendra Fadnavis, Anjali Damania, Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • अत्यंत थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’च्या तोंडावर पहिल्याच पावसात दरड कोसळली आणि रस्त्यावर खड्डे पडले.
  • देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक होत टीका करणाऱ्यांना पैसे घेऊन सोशल मीडियावर ट्रोल करणारे “भाडे के टट्टू” म्हटले होते
  • ६६ दिवसांच्या आत झालेल्या नुकसानीला निकृष्ट दर्जाचे काम आणि सरकारी पातळीवरील अफाट भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचा आरोप
Anjali Damania Criticized Devendra Fadnavis:    मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकचा मोठा थाटामाटात उद्घाटन सोहळा पार पडला होता. पण अवघ्या ६६ दिवसांतच पहिल्याच पावसात मिसिंग लिंकच्या तोंडावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्यामुळे आणि लिंकवरील खड्ड्यांमुळे सर्व विरोधी पक्षांकडून भाजप सरकारवर टिकेची झोड उडाली आहे. मिसिंग लिंकला पडलेल्या भगदाडावरून राज्यभरातून टिका होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिका करणाऱ्यांना थेट “भाडे के टट्टू” अशा शब्दात खिल्ली उडवली. फडणवीस यांच्या या टिकेवरुन आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फडणीसांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना कुत्रं विचारत नाही, ते सोशल मीडियावर पैसे घेऊन टिका करतात, असा आरोप केला. त्यांच्या या टिकेवर अंजली दमानिया यांनीदेखील पलटवार केला आहे. “फडणवीसांच्या वक्तव्यावरून अहंकार, फक्त आणि फक्त अहंकार दिसत असल्याचे म्हटले आहे. दमानिया यांनी ट्विट करत मिसिंग लिंकवरून फडणवीसांना धारेवर धरलं आहे.

व्यावसायिक चालकांना मराठी बंधनकारक! १६ ऑगस्ट २०२६ पासून अंमलबजावणी होणार; कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी

आता म्हणतात ‘देखलुंगा’

अहंकार.. फक्त आणि फक्त अहंकार. मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना सगळ्यांना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का एक मुख्यमंत्र्यांना? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अफाट भ्रष्टाचार होत असताना आवाज उठवला तर मुख्यमंत्री म्हणतात ‘देखलुंगा’? हेच फडणवीस कोणे एके काळी भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात मांडायचे. आता म्हणतात ‘देखलुंगा’. असा शब्दांत ट्विट करत अंजली दमानिया यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर तोफ डागली आहे.

Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. “वैफल्य, अहंकार, माज वैगरे वैगरे… हे सर्व क्षणात उतरेल! महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे! पण काय करणार? खाण तशी माती! देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय? सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, लूटमार, झुंडबाजीवर जनतेन बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे!” असा आरोपही त्यांनी केला.

सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर ‘ऑन रेकॉर्ड’ सवाल

दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही, “मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर ‘कुत्ते’, ‘भाडे के टट्टू’ आणि तत्सम अतिशय ‘सभ्य’ आणि ‘संसदीय’ शब्दांमध्ये मोठमोठ्याने दरडावून सांगितले की महाराष्ट्राची बदनामी करू नका.” अशा खोचक शब्दांत फडणवीसांना सुनावलं आहे.

पहाटेचा शपथविधी करणारे असोत किंवा ज्यांना ‘चक्की पिसायला लागेल’ असे आधी म्हटले गेले होते आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, त्या सगळ्यांना आता आपल्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसवून घेणारे कोण होते? यामुळे महाराष्ट्राचा अपमान झाला की सन्मान वाढला, हे त्याच सभागृहाच्या पटलावर ‘ऑन रेकॉर्ड’ सांगण्याचे कष्ट मुख्यमंत्री महोदय घेतील का?

अधिवेशनाच्या काळात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्यामुळे राज्यातील राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

 

Web Title: Mumbai pune expressway missing link row anjali damania slams devendra fadnavis bhade ke tattu remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Mumbai - Pune Expressway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.