Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटली’; हसन मुश्रीफांचा अधिकाऱ्यांना इशारा

नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर रस्त्यांची खराब अवस्था दिसल्याचे सांगत त्यांनी संबंधित विभागाला जाब विचारण्याचा इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Aug 15, 2026 | 10:00 PM
‘नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटली’; हसन मुश्रीफांचा अधिकाऱ्यांना इशारा

‘नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटली’; हसन मुश्रीफांचा अधिकाऱ्यांना इशारा

Follow Us
Follow Us:
  • ‘नंदुरबारचे रस्ते पाहून मला लाज वाटली’; हसन मुश्रीफांची नाराजी
  • पावसाळ्यात रस्ते उखडण्यावरून संबंधित विभागाला जाब विचारणार
  • पावसाळ्यानंतर दर्जेदार रस्ते करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची खराब अवस्था पाहून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. ‘आज जे पाहिले ते पाहून मला लाज वाटली,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

सुरतहून नंदुरबारकडे येताना रस्त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गुजरातची हद्द संपल्यानंतर महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था खराब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच श्रावणीकडे जाणाऱ्या रस्त्याचीही स्थिती चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता का उखडतो?’

रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते उखडत असतील तर त्याची कारणे शोधली पाहिजेत, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. संबंधित विभागाला याबाबत जाब विचारणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा

नंदुरबारचे रस्ते व्यवस्थित आणि दर्जेदार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. खराब रस्ते आणि निकृष्ट कामांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यास जिल्ह्याचा विकास होणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

‘कोल्हापुरात अशी परिस्थिती असती तर…’

नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून मुश्रीफ यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे उदाहरण दिले. कोल्हापुरात अशी परिस्थिती असती तर अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांनाही सोडले नसते, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पालकमंत्री म्हणून नंदुरबारची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

KDMC Politics: केडीएमसीतील शिंदेसेना-मनसे मैत्रीवर रविंद्र चव्हाणांचे मोठे विधान; ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ म्हणत निशाणा

आदिवासी भागाच्या विकासावर भर

पावसाळा संपल्यानंतर नंदुरबारमध्ये चांगले आणि दर्जेदार रस्ते करण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या भागाच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. मात्र, या निधीचा योग्य आणि प्रभावी वापर झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री म्हणून वेळात वेळ काढून विकासकामांचा आढावा घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाहीही हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

Web Title: Nandurbar road condition hasan mushrif warning officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 10:00 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • Nandurbar News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.