Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी राऊतांनी कुभांड रचल्याचा दावा केला आहे. आमदारांच्या बैठकीत उद्धव आणि रश्मी ठाकरेंबाबत राऊतांनी अपशब्द वापरल्याचा गौप्यस्फोटही म्हस्के यांनी केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2026 | 05:39 PM
'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी राऊतांनी कुभांड रचले', नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप

'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी राऊतांनी कुभांड रचले', नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • ‘उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊ नये यासाठी राऊतांनी कुभांड रचले
  • आमदारांच्या बैठकीत उद्धव, रश्मी ठाकरेंबाबत राऊतांची शिवीगाळ
  •  एकनाथ शिंदेंविरोधात एकतरी पत्र दाखवा
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनू नयेत, यासाठी पवईतील हॉटेलमध्ये संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना बैठक घ्यायला लावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंना विरोध करा, माझे नाव पुढे करा, असा आग्रह राऊत यांनी आमदारांपुढे धरला होता. राऊत यांनी याच बैठकीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी आज केला. एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारींचे एकतर पत्र दाखवा नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान खासदार म्हस्के यांनी राऊत यांना दिले.

राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात गरळ

खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राज्यसभेची उमेदवारी राऊत यांना जाहीर करताना विलंब झाला होता, त्यावेळी राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या. उद्धव ठाकरेंविरोधात राऊत यांनी पवईतील हॉटेलात आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत राऊत यांनी उद्धव ठाकरेंविरोधात गरळ ओकली, असा दावा खासदार म्हस्के यांनी केला.

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का? ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण स्वत:च्या भावाला मंत्रिपद दिले नाही. तसेच खासदारकीची उमेदवारी देण्यात उशीर झाल्याने राऊत हे उद्धव ठाकरेंवर चिडले होते, हे शिवसेनेला माहित आहे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हा प्रमुख मी आहे. उद्धव ठाकरेंनी फोन केला तेव्हा त्यांनाही मी वर्षा बंगल्यावर येणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यावरील अन्याय दूर करा, पक्षाला त्यांची गरज आहे, असे उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगणारा मी एकमेव होतो, असे खासदार म्हस्के म्हणाले. ठाण्याचे नेतृत्व कर, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, मात्र आपण शिंदे साहेबांसोबतच जाणार, असे वर्षा बंगल्यावर ठणकावून सांगणारा मीच एकमेव होतो, असे खासदार म्हस्के म्हणाले.

तुमच्या खासदाराकीचा राजीनामा द्या

सकाळचा भोंगा अशी उपमा दिल्याने राऊतांना आपल्यावर राग आहे, असे खासदार म्हस्के म्हणाले. विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, असे राऊत तुम्ही अयोध्येत मला एकनाथ शिंदेंसमक्ष सांगितले होते. पण आमशा पाडवी यांना तिकिट दिले कारण नरेश म्हस्के एकनाथ शिंदेंसोबत जाईल म्हणून संधी देऊ नका, असे उद्धव ठाकरेंना कोणी सांगितले, असा सवाल खासदार म्हस्के यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा वेगळी भूमिका घेतली तेव्हा रोज सकाळ संध्याकाळ फोन करुन तुम्ही काय काय बोलत होतात, हे तुम्हीच जाहीर करा. एकनाथ शिंदेंविरोधात तक्रारीचे एकतरी पत्र दाखवा अन्यथा तुमच्या खासदाराकीचा राजीनामा द्या, असे प्रतिआव्हान खासदार म्हस्के यांनी दिले.

राऊत यांचे ठाकरेंबाबत बेगडी प्रेम आहे. उद्धव ठाकरेंच्या डोक्यात मुख्यमंत्री होण्याचे खूळ राऊत यांनीच घातले आणि महाराष्ट्राला एक कुचकामी मुख्यमंत्री दिला. एकसंध पक्षाचे वाटोळे करण्याचे काम राऊत यांनी केले. राऊतांना पक्ष ताब्यात घ्यायचा होता आणि काँग्रेसमध्ये विलीन करायचा आहे, अशी घणाघाती टीका खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली. शिवसैनिकांचे शाप तुम्हाला भोगावे लागतील, असे खासदार म्हस्के म्हणाले.

Monsoon Session Parliament News 2026: १७ दिवस, १६ तास अन १०८ कोटींचे नुकसान; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत काय घडले?

Web Title: Naresh mhaske serious allegations against sanjay raut uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
1

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
2

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग
3

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
4

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.