Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger : ‘एवढं रवंथ गायी – म्हशीही करत नाहीत,’ दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर राऊत भडकले!

NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतापले. 'विलिनीकरणाने देश चालतो का?' असा सवाल करत त्यांनी शरद पवारांनाही टोला लगावला.

  • By विवेक
Updated On: Nov 10, 2026 | 11:39 AM
sanjay raut

sanjay raut

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊत संतापले
  • चर्चेचा अतिरेक झाल्याचा राऊतांचा टोला
  • पवारांनी मोदींना पत्र लिहावं, राऊतांचा खोचक सल्ला
 

NCP Merger : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षांचं एकत्रीकरण होणार की नाही, याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी माध्यमांवरच संताप व्यक्त केला. ‘विलिनीकरणाने देश चालतो का? एवढं रवंथ गायी-म्हशीही करत नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी सुरू असलेल्या चर्चेचा समाचार घेतला.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या काय आणि नाही आल्या काय, त्याने काय फरक पडतो? देशासमोर अनेक प्रश्न आहेत. शेतकरी हवालदिल आहेत, दुष्काळाची परिस्थिती आहे, सामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. मात्र, दिवसभर विलिनीकरणाचीच चर्चा सुरू आहे. या चर्चेचा अतिरेक झाला असून एक दिवस चर्चा करणाऱ्यांच्या मेंदूचा स्फोट होईल, असा खोचक टोला राऊतांनी लगावला. शरद पवारही या चर्चांचा आनंद घेत असल्याचं ते म्हणाले.

पवारांनी मोदींना पत्र लिहावं, राऊतांचा सल्ला

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवार नेहमीच लक्ष ठेवून असतात. त्यामुळे त्यांनी कोल्हापुरातील गोकुळच्या प्रश्नातही लक्ष घालावं, असं राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना फोन करून देशाचे प्रश्न आपण दोघे मिळून सोडवू, असं सांगितलं होतं. त्यामुळे आता पवारांनी मोदींना पत्र लिहून आधी गोकुळचा प्रश्न सोडवण्याची मागणी करावी, असा खोचक सल्ला त्यांनी दिला. गोकुळमध्ये लोकशाहीविरोधी पद्धतीने कारभार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

सरनाईक येणार, बेसनचा लाडू खाणार!

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राऊत यांच्या घरी झालेल्या भेटीचीही चर्चा रंगली. यावर बोलताना, सरनाईक आणि आपल्या आईचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते दिवाळीत घरी येतात. बेसनचा लाडू आणि चकली खातील, आईचा आशीर्वाद घेतील. यात कोणताही राजकीय संकेत नाही, असं राऊतांनी स्पष्ट केलं.

‘शिंदे गटात दोन शिंदे गट’

दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता राऊतांनी नकारार्थी उत्तर दिलं. ‘शिंदे गटात दोन गट आहेत. शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्हीच शोधा,’ असं सूचक विधान त्यांनी केलं.

अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीवरून सवाल

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघातात सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत कोणीही गंभीर दिसत नसल्याचं राऊत म्हणाले. आरोप करणाऱ्यांकडे काही पुरावे असतील तर त्याची दखल घेऊन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Sunil Tatkare : ‘रामदास कदम माझ्या पाया पडले होते’; सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा, कायदेशीर नोटीसही देणार!

💡

Frequently Asked Questions

  • Que: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर संजय राऊत काय म्हणाले?

    Ans: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. 'विलिनीकरणाने देश चालतो का? एवढं रवंथ गायी आणि म्हशीही करत नाहीत,' असा टोला त्यांनी लगावला.

  • Que: शरद पवारांना संजय राऊत यांनी काय सल्ला दिला?

    Ans: शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आधी गोकुळ दूध संघाचा प्रश्न सोडवण्याची मागणी करावी, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला.

  • Que: प्रताप सरनाईक यांच्या भेटीबाबत संजय राऊत काय म्हणाले?

    Ans: प्रताप सरनाईक आणि त्यांच्या आईचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सरनाईक दिवाळीत घरी येतात, बेसनचा लाडू आणि चकली खातात, आईचा आशीर्वाद घेतात. या भेटीमागे कोणताही राजकीय संकेत नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Sanjay raut reaction ncp merger sharad pawar ajit pawar vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात
1

Sanjay Raut: भाजपसोबत जाणे म्हणजे लाचारी, स्वाभिमान सोडणे! संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चांवर उदय सामंतांचं मोठं विधान!
2

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चांवर उदय सामंतांचं मोठं विधान!

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला
3

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?
4

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.