Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांच्या पक्षात चाललंय तरी काय? भुजबळांनंतर आणखी एक नेता पालकमंत्रिपदावरुन नाराज

महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरुन राजकारण रंगले असून रस्सीखेच सुरु आहे. अजित पवार गटातील आणखी एका नेत्याने आपली नाराजी व्यक्त केली आहे. हिंगोलीचे पालकमंत्रीपद दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 26, 2025 | 04:34 PM
अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज

अजित पवारांमुळे भाजपा खासदार झाले नाराज

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये एकतर्फी असे यश मिळाले आहे. मात्र महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये निकालानंतर जोरदार नाराजीनाट्य सुरु आहे. जागावाटप, मुख्यमंत्रिपद, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्रिपद अशा सर्वच मुद्द्यांवरुन महायुतीमधील बडे नेते हे नाराज आहेत. अजित पवार गटातील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी न दिल्यामुळे ते नाराज आहेत. तर नाशिकमधील अजित पवार गटाचे आणखी एक नेते पालकमंत्री पद वेगळ्याच जिल्ह्याचे मिळाल्यामुळे नाराज आहेत. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या नाराजीचे वारे वाहत आहेत.

पालकमंत्रिपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येत आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे. तर आता दुसरीकडे अजित पवार गटातील नेते व दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीचे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर एका महिन्याने पालकमंत्रिपद जाहीर करण्यात आले. यामध्ये नरहरि झिरवाळ यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आहे. मात्र यावरुन ते नाराज असून आता ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना जाब विचारणार आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

वसमतमध्ये आमदार नवघरे यांच्या वतीने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार कार्यक्रमाला आमदार प्रताप पाटील चिखलीकर, तानाजी मुटकुळे यांच्यासह महायुतीचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नरहरी झिरवळ यांनी मिश्किल विधान केले. “तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? याबद्दल मी मुंबईला गेल्यानंतर वरिष्ठांना जाब विचारणार”, असे विधान नरहरी झिरवळ यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला?

“मी आज जरा कार्यक्रमासाठी उशिरा आलो. मंत्री पहिल्यांदाच झालो. पालकमंत्री पहिल्यांदाच झालो. झालो तो झालो, आता इथे आल्यावर समजलं की हा अल्प आणि गरीब जिल्हा आहे. मी आता सोमवारी गेल्यावर विचारणार आहे की तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? असा सवाल नरहरी झिरवळ यांनी केला. पण यातूनही आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी मिळून युवकांचे प्रश्न, ज्येष्ठांचे प्रश्न असतील किंवा विविध समाजाचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करेन”, असे देखील नरहरी झिरवळ म्हणाले आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तुमच्यासमोर माांडण्याऐवजी माझ्या समोर मांडा – अजित पवार

नरहरी झिरवळ यांनी पालकमंत्रिपदावरुन नाराजी व्यक्त केल्यानंतर आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “असं काही होणार नाही. मी त्यांना विचारेन. दर मंगळवारी आमची मिटिंग असते. असे विधान केलं असेल तर योग्य नाही. त्यांच्याशी चर्चा करून का समज गैरसमज असेल तर दूर करेने, असे अजित पवार म्हणाले. कुणाच्या काही समस्या असेल तर मंगळवारच्या बैठकीत मांडण्याचा अधिकार आहे. त्या तुमच्यासमोर माांडण्याऐवजी माझ्या समोर मांडा, असं सांगणार आहे”, असे अजित पवारांनी सांगितले.

Web Title: Narhari zirwal expressed displeasure with ajit pawar for giving guardian minister of hingoli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Narhari Zirval
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!
1

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान
2

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

Dharashiv News: धाराशिवमध्ये भीषण अपघात; BLO कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा जागीच मृत्यू
3

Dharashiv News: धाराशिवमध्ये भीषण अपघात; BLO कामावरून परतणाऱ्या शिक्षकाचा जागीच मृत्यू

“आमच्या गुरूला तू का बोललास…”, शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक; पिस्तूल दाखवत धमकावल्याचा गंभीर आरोप
4

“आमच्या गुरूला तू का बोललास…”, शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाही फेक; पिस्तूल दाखवत धमकावल्याचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.