Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut on Amit Shah: राहुल गांधींच्या आरोपांनंतर गृहमंत्री गायब का? संजय राऊतांनी तोफ डागली

शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेवर बोलताना राऊत म्हणाले की, आता न्यायालय काय निर्णय देते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. "संविधान आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय झाला, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले लोक अपात्र ठरतील," असा दावा त्यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 30, 2026 | 01:21 PM
Sanjay Raut on  Amit Shah: राहुल गांधींच्या आरोपांनंतर गृहमंत्री गायब का? संजय राऊतांनी तोफ डागली
Follow Us
Follow Us:
  • ‘लापता लेडीज’ नावाचा सिनेमा आला होता, आता ‘लापता गृहमंत्री’ नावाचा सिनेमा काढावा लागेल- संजय राऊत
  • दिल्ली पोलिसांवर नियंत्रण केंद्रीय गृहमंत्रालयाचे असल्याने लाठीहल्ल्याची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी अमित शाह यांच्यावरच- संजय राऊत
  • पुलवामा हल्ल्यानंतरही गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी होती- संजय राऊत
 

Sanjay Raut PC: “देशाचे गृहमंत्री कुठे आहेत? त्यांना शोधावे लागत आहे. ‘लापता लेडीज’ नावाचा सिनेमा आला होता, आता ‘लापता गृहमंत्री’ नावाचा सिनेमा काढावा लागेल. विरोधी पक्षनेते राहुल गांधी तुमच्यावर गंभीर आरोप करत आहेत, मग तुम्ही समोर येऊन उत्तर का देत नाही?” असा खोचक प्रश्न विचारत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिंदे गट, तसेच योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर शाह यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.

‘लाठीहल्ल्याचे आदेश अमित शाह यांनी दिले’

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा उल्लेख करत राऊत यांनी आरोप केला की, संसद मार्ग पोलीस ठाण्यातील नोंदींमध्ये आदेशांची माहिती आहे. दिल्ली पोलिसांवर नियंत्रण केंद्रीय गृहमंत्रालयाचे असल्याने लाठीहल्ल्याची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी अमित शाह यांच्यावरच असल्याचा दावा त्यांनी केला.

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात

राहुल गांधी यांनी केलेली अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी ही केवळ विरोधकांची नव्हे, तर देशातील जनतेची भावना असल्याचेही राऊत म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतरही गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारायला हवी होती, असा दावा करत त्यांनी, “गृहमंत्र्यांना माहिती नसताना गोळीबार झाला असेल, तरी ती त्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे ते दोन्ही बाजूंनी जबाबदार ठरतात,” अशी टीका केली.

‘जितेंद्र सिंह खोटे बोलत आहेत’

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. “ते स्वतःचे मत मांडत नाहीत, त्यांना लिहून दिलेले भाषण वाचावे लागते,” असा आरोप त्यांनी केला.

शिंदे गटाच्या सुनावणीवर भाष्य

शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रियेवर बोलताना राऊत म्हणाले की, आता न्यायालय काय निर्णय देते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. “संविधान आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय झाला, तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले लोक अपात्र ठरतील,” असा दावा त्यांनी केला.

Gokul Milk Union Election: ‘गोकुळ’ची निवडणूक तत्काळ सुरू करा! कोल्हापूर सर्किट बेंचचे राज्य सरकारला आदेश

संजय राऊत म्हणाले, “शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष दुसऱ्यांच्या हाती देणे चुकीचे आहे. न्यायालयाने संविधानानुसार आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय द्यावा. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.”

बाबा रामदेव यांच्यावरही टीका

योगगुरू बाबा रामदेव यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. “तुम्ही आंदोलन केले होते, तो देशाचा अपमान नव्हता का? महिलांचे कपडे घालून आंदोलनस्थळावरून पळ काढला होता, तेव्हा देशाच्या सन्मानाचे काय झाले होते?” असा सवाल त्यांनी केला.तसेच भविष्यात सत्ता बदलल्यास राहुल गांधी यांचा सन्मान करणाऱ्यांमध्ये बाबा रामदेव यांचाही समावेश असेल, असा टोला लगावत त्यांनी रामदेव यांच्यावर राजकीय भूमिकेत सातत्य नसल्याची टीका केली.

पुण्यातील कार्यक्रमावर आक्षेप

राऊत यांनी अमित शाह यांना पुण्यात सन्मानासाठी बोलावण्यात आल्याच्या वृत्तावरही आक्षेप घेतला. “ज्यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत, अशा व्यक्तीचा सन्मान होऊ नये. पुणेकरांनी याला विरोध करावा,” असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, सत्ताधारी पक्षाकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: National news sanjay raut press conference attacks amit shah lapata home minister remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CJP Protest
  • sanjay raut
  • Student Protest

संबंधित बातम्या

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात
1

CJPला परदेशातून फंडिंग मिळत असेल तर अमित शाहांचे अपयश…; अभिजीत दिपकेंचा घणाघात

Rahul Gandhi: ‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाह जबाबदार; पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना…’; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
2

Rahul Gandhi: ‘विद्यार्थ्यांवरील अत्याचाराला अमित शाह जबाबदार; पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना…’; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

Rahul Gandhi PC: माईक बंद कराल, पण विद्यार्थ्यांचा आवाज नाही!; संसदेत बोलू न दिल्याने राहुल गांधींचा आरोप
3

Rahul Gandhi PC: माईक बंद कराल, पण विद्यार्थ्यांचा आवाज नाही!; संसदेत बोलू न दिल्याने राहुल गांधींचा आरोप

Vande Mataram Bill: राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर; अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा
4

Vande Mataram Bill: राज्यसभेत वंदे मातरम विधेयक मंजूर; अपमान केल्यास होणार ३ वर्षांची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.