
'...तर मग आमचे पक्ष का फोडले?'; खासदार संजय राऊत यांचा सवाल
संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर ते म्हणाले, ‘अजित पवार गट काय बोलतो, याला महत्त्व नाही. तुम्ही जिथे आहात, तिथेच अडचणीत आहात. अजित पवार गटाने शरद पवारांसोबत येऊन काम करायचे की नाही, याचा निर्णय शरद पवार घेतील. शरद पवार तुमच्यासोबत सत्तेत जाणार नाहीत’. तसेच डिलिमिटेशन विधेयकावरून सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर राऊत म्हणाले, ‘राजकीय कवायती सुरू आहेत. जाळी फेकली जात आहेत. मात्र, यात छोटा किंवा मोठा कोणताही मासा सापडणार नाही. अपेक्षित आकडा पूर्ण होणार नाही’.
दरम्यान, सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, सुनील तटकरे यांना परस्परविरोधी वक्तव्ये का करावी लागत आहेत? मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल यांच्या ईडी केसेस निकाली निघाल्या आहेत. पक्षाची सर्व सूत्रे पार्थ पवार यांच्याकडे आहेत. ते पक्षाचे नेते आहेत. पार्थ पवार यांच्यासोबत सर्वांना काम करावे लागेल. पार्थ पवार त्यांच्या पद्धतीने पक्ष पुढे नेत आहेत. पक्षात आणखी काही नवीन गोष्टी करायच्या असतील, तर त्या त्यांच्या पद्धतीने होतील.
पवार साहेब हे पूर्णवेळ राजकारणी
शरद पवार यांच्या राजकीय सक्रियतेवर संजय राऊत म्हणाले, पवार साहेब हे पूर्णवेळ राजकारणी आहेत. त्यांचा प्रत्येक क्षण राजकारणाच्या चर्चेत जातो. पवार साहेबांना पुस्तक वाचायचे होते. बोध आणि कीर्तन या पुस्तकाची प्रत मी त्यांना दिली.
अश्विनी भिडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात बिल्डर्सची नावे असून, कामात बेकायदेशीर दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात मीदेखील लवकरच पत्र लिहिणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री कोणते राक्षस वाढवत आहेत? महापालिका आयुक्तांना पत्र लिहावे लागते, याचा अर्थ त्यादेखील या छळाला कंटाळल्या आहेत.
१. संजय राऊत यांनी कोणता सवाल उपस्थित केला?
पंतप्रधान मोदी देश सांभाळण्याची जबाबदारी असल्याचे सांगत असतील, तर आमचे पक्ष का फोडले?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
२. शरद पवार यांच्याबाबत राऊत काय म्हणाले?
शरद पवार हे इंडिया आघाडीचे मोठे स्तंभ असल्याचे राऊत यांनी सांगितले.
३. संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली का?
संजय राऊत यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. मात्र, पवार यांच्यावर उपचार सुरू असल्याने सविस्तर चर्चा होऊ शकली नाही.