Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashutosh Ranka CJP Jaipur Attack: जयपूरमध्ये CJPच्या टिमवर गुंडाचा हल्ला…; आशुतोष रांकांचा भाजपवर गंभीर आरोप

Ashutosh Ranka: आशुतोष यांच्यासह १० ते १५ सीजेपी कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीजेपीने वाटिका रोडवरील भट्टावाला सरकारी शाळेची पाहणी करण्याची योजनाही आखली होती, पण या प्रकारामुळे ही पाहणी तुर्तास रद्द करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 21, 2026 | 02:53 PM
Ashutosh Ranka CJP Jaipur Attack: जयपूरमध्ये CJPच्या टिमवर गुंडाचा हल्ला…; आशुतोष रांकांचा भाजपवर गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:
  • जयपूरजवळील रामपुरा कंवरपुरा शासकीय शाळेची पाहणी करताना सीजेपी टीमवर हल्ला.
  • भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण, गाडीची तोडफोड आणि महिला सहकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप.
  • आरोपींना अटक न झाल्यास राज्यभरात आंदोलनाचा सीजेपीचा इशारा.
Ashutosh Ranka CJP Jaipur Attack: कॉकरोच जनता पार्टीच्या स्कूल ठिक करो मोहिम सुरू आहे. या मोहिमेंतर्गंत सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जयपूरमध्ये हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आशुतोष रांका आणि त्यांच्या सहकारी शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बागरू येथील रामपुरा कंवरपुरा येथील शासकीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. याठिकाणी गावकऱ्यांनी त्यांना मारहाण करून हाकलून लावले. त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.

या हल्ल्याप्रकरणी आशुतोष रांका यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “हल्ल्यात वाहनांच्या काचा आणि मोबाईल फोन फोडण्यात आले. एका महिला सहकाऱ्यालादेखील मारहाण करण्यात आली आणि तिचा शर्ट फाडण्यात आला. आमच्या टीममधील एका सदस्याचा हात फ्रॅक्चर झाला.” असा आरोप रांका यांनी केला आहे.

Rahul Gandhi Parliament Street News: संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे राजकारण तापणार

रांका म्हणाले, “आज संपूर्ण देशाने भाजपची गुंडगिरी प्रत्यक्ष पाहिली. पोलिसांना याठिकाणी हा प्रकार होणार असल्याची माहिती आधीपासूनच होती. जयपूरचे हे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून घडले. आम्ही ४८ तासांचा अल्टिमेटम देत आहोत. हल्लेखोरांना अटक झाली पाहिजे आणि शाळा तपासणी थांबवण्याचा आदेश मागे घेतला पाहिजे. असे न झाल्यास, आम्ही संपूर्ण राजस्थानमध्ये आंदोलन करू आणि दिलावर यांच्या राजीनाम्याची मागणी करू.” असा इशारा आशुतोष रांका यांनी दिला आहे.

तत्पूर्वी, सकाळी सुमारे ८ वाजता, काही सीजेपी कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी धक्काबुक्की केली. गावकऱ्यांनी त्यांना गावातून हाकलून दिले. सीजेपीविरोधात घोषणाबाजी करत गावकऱ्यांनी सरकारी शाळेबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली लावून गावातील मुख्य रस्ता अडवला आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष यांच्यासह १० ते १५ सीजेपी कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीजेपीने वाटिका रोडवरील भट्टावाला सरकारी शाळेची पाहणी करण्याची योजनाही आखली होती, पण या प्रकारामुळे ही पाहणी तुर्तास रद्द करण्यात आली आहे.

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ९२ लाख महिला अपात्र; काय होती मुख्य कारणे?

या सगळ्या प्रकरावर आशुतोष रांका यांनी ट्विट करत राजस्थान भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “कंवरपुरा येथील रामपुरामधील सरकारी शाळा गेल्या अनेक वर्षांपासून म्हशींच्या गोठ्यात चालवली जात आहे. मी नुकताच तिथे पोहोचलो आहे. पण तिथे पोहोचलेल्या आमच्या टीममधील काही सदस्यांवर भाजपच्या गुंडांनी पुन्हा हल्ला केला.

येथील विद्यार्थी म्हशींच्या गोठ्यात शिकत आहेत, हे भाजपला मान्य आहे, पण आम्ही या शाळा सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, हे त्यांना मान्य नाही. यापेक्षा अधिक लाजिरवाणे काय असू शकते? असा संतापजनक सवालही रांका यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, सीजेपीच्या टिमला मारहाण करणारे हे गावकरी नसून भाजपने भाड्याने आणलेले गुंड आहेत. त्यांचे नेते, कमल प्रधान, तिथल्या गरीब लोकांची जमीन बळकावण्याचे काम करत आहेत. मुलांना म्हशींच्या गोठ्यात शिकवले जात आहे, आणि जेव्हा आम्ही हे थांबवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भाजप आपले गुंड पाठवत आहे. किती लाजिरवाणी परिस्थिती आहे. असही संतापही रांका यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title: National newscjp spokesperson ashutosh ranka team attacked in jaipur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • BJP Government
  • Rajsthan

संबंधित बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
1

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

राजस्थानचे पिप्लांत्री गाव; मुलीच्या जन्मावर १११ झाडे लावून पर्यावरण व स्त्री सक्षमीकरणाचा सुंदर संगम साधणारा अनोखा उपक्रम!
2

राजस्थानचे पिप्लांत्री गाव; मुलीच्या जन्मावर १११ झाडे लावून पर्यावरण व स्त्री सक्षमीकरणाचा सुंदर संगम साधणारा अनोखा उपक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.