“मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली?” राज ठाकरेंच्या ओपन चॅलेंजला निशिकांत दुबेंचं एका वाक्यात प्रत्युत्तर (फोटो सौजन्य-X)
Nishikant Dubey On Raj Thackeray News In Marathi: महाराष्ट्रात भाषेवरून राजकारण शिगेला पोहोचले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच आहे.’पटक पटक कर मारेंगे‘ असं म्हणत राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना ‘अरे दुबे तू मुंबईत ये… समंदर में डुबे डुबे के मारेंगे‘, असं प्रत्युत्तर मनसे अध्यक्षांनी दिलं होतं. यावर आता निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंवर टीका करताना म्हटले, “तुम्ही मला हिंदी शिकवली का?”
अलीकडेच एका दुकानदाराला मराठी न बोलल्याबद्दल मारहाण करण्यात आली होती, ज्यावर निशिकांत दुबे यांनी “पटाक-पटाक के मारेंगे” असे म्हटले होते. त्यांच्या या विधानावरून बराच वाद निर्माण झाला होता. गोड्डाचे खासदार म्हणाले होते, “जर मुंबईत हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांना मारहाण करा, तमिळ आणि तेलगू भाषिकांना मारहाण करा.” ते पुढे म्हणाले होते, “जर तुम्ही इतके मोठे बॉस असाल तर बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये या, आम्ही तुम्हाला मारहाण करू.”
यावर राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत बोलताना निशिकांत दुबे यांना मुंबईत येण्याचे आव्हान दिले आणि म्हणाले, “. कुणीतरी भाजप खासदार म्हणतो की, पटक पटक कर मारेंगे… त्या निशिकांत दुबे विरोधात गुन्हा दाखल झाला का, त्याचा मागे नेमकं कोण आहे? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. त्यावेळी त्यांनी दुबेंना आव्हान दिलं. निशिकांत दुबेने वक्तव्य केलं तेव्हा कुठंही हिंदी चॅनल्सवर बातम्या झाल्या नाही. आता मी त्याला आव्हान देतो. त्याने मुंबईत येऊन दाखवावं. मग कळेल कोण कुणाला कसा मारतो. इकडे ये तुला इथल्या समुद्रात डुबे डुबे कर मारेंगे, असं राज ठाकरे म्हणाले. त्यावर आता दुबे यांनी एका वाक्यात उत्तर देत राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ? https://t.co/5YpM1SrzDt
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 18, 2025
यावर आता निशिकांत दुबेंनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी X वर पोस्ट करतं म्हटलं आहे की, मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी? असा सवाल निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विचारला आहे. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? असा सवाल देखील सोशल मीडियावर विचारला जात आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल देखील केलंय.