मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहामध्ये विधानसभा मारामारी प्रकरणावरुन पारा चढला (फोटो - सोशल मीडिया)
Devendra Fadnavis Marathi News : मुंबई : राज्यामध्ये सध्या विधीमंड़ळ आवारामध्ये झालेल्या हाणामारीवरुन वातावरण तापले आहे. विधानसभेच्या लॉबीमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला. विधीमंडळाच्या आवारामध्ये झालेला हा राडा ही पहिलीच वेळ असल्यामुळे विरोधकांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. तर सत्तधारी नेत्यांनी देखील योग्य कारवाईची मागणी केली. दरम्यान, विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला.
विधीमंडळाच्या आवारामध्ये झालेल्या या राड्यावर विधानसभेमध्ये चर्चा होती. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय जाहीर केला. या मारहाणीच्या प्रकरणासंदर्भात विशेषाधिकारी समितीकडे निर्णय देण्याचे सांगितले आहे. याबाबत चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या दोन्ही नेत्यांना माफी मागण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे दोन्ही नेत्यांनी सभागृहामध्ये दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना कार्यकर्ता नितीश देशमुख हा माझ्यासोबत आला नव्हता असे म्हणत त्यासंबंधित सोशल मीडियावर आलेली धमकीचा मुद्दा आव्हाडांनी उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात नवीन मुद्दा उपस्थित करताना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रोखले. यामुळे जयंत पाटील हे मध्ये बोलले. जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांना बोलू द्यावे अशी विनंती केली. मात्र यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना राग अनावर झाल्याचे दिसून आले. सभागृहाची मर्यादा आणि मान याबाबत बद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
विरोधी बाकावर बसलेल्या जयंत पाटील यांनी विनंती करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतापाने म्हणाले की, जयंतराव, आपण फार सिनिअर आहात. ही प्रतिष्ठा काय, कुण्या एका व्यक्तीची नाही. इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. धमकीचा उल्लेख करण्याला कुणाचीही ना नाही. विषय काय चालला आहे. अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी आपण राजकारणाच्या पलीकडे आणार आहोत की नाही, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज ह्या ज्या काही शिव्या बाहेर पडतायेत, त्या काही एकट्या पडळकरला किंवा ह्यांच्या माणसाला पडत नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या नावाने बाहेर बोललं जातंय की, हे आमदार माजलेत म्हणून. जरा गांभीर्यानं घ्या. प्रत्येक गोष्ट अशी राजकीय करून आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत, जयंतराव, हे बरोबर नाही. अशाप्रकारे समर्थन करणे योग्य नाही,” अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे विधीमंडळामध्ये शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला.