'आष्टीचा जब्या' आणि 'मन्या म्हणत विलास घुले हत्या प्रकरणावरून नवनाथ वाघमारे यांचा जरांगे पाटील, सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल
बीड : बीड जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या विलास घुले हत्या प्रकरणावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी काही नेत्यांचा एकेरी उल्लेख करत आक्रमक भूमिका मांडली.
वाघमारे यांनी आरोप केला की, विलास घुले हत्या प्रकरण दडपण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत आहेत. त्यांनी खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांच्यावरही निशाणा साधला.
या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरू असताना, “एसआयटीमध्ये काहीच सापडले नाही हे मनोज जरांगे पाटील यांना कसे काय माहिती?” असा सवालही वाघमारे यांनी उपस्थित केला. यावेळी टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी मनोज जरंगे पाटलांचा उल्लेख मन्या असा केला. तर, आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करताना त्यांनी ‘आष्टीचा जब्या‘ म्हणत त्यांची खिल्ली उडवली.
‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
दरम्यान, या प्रकरणावरून वातावरण तापलेले असतानाच वाघमारे हे याबाबत थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे याबाबत तक्रार करणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची सर्व माहिती देणार आहोत, असेही वाघमारे यांनी सांगितले.
या प्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचे नाव या प्रकरणात आल्याने मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. हे हत्या प्रकरण दडपण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप वाघमारेंनी केला असून त्यांनी खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडित यांच्यावरही निशाणा साधला.
विलास घुले हत्या प्रकरणानंतर ओबीसी समाज अधिक आक्रमक होताना दिसत आहे. विविध ओबीसी संघटनांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली जात आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी देखील या प्रकरणावर आपापली बाजू मांडताना दिसत आहेत.






