
बोगस मतदानाचे आरोप फालतू! नवाब मलिकांनी विरोधकांना सुनावले; मतदारांना केले 'हे' महत्त्वाचे आवाहन (Photo Credit - X)
मतदान केंद्रांवर बोटाला लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारींवर मलिक म्हणाले की, “पूर्वी शाई काडीने लावली जायची, आता मार्कर पेनचा वापर होत आहे. शाई कुठेही पुसली जात नाहीये. १५ वर्षांपूर्वी मतदार यादीत फोटो नसायचे, पण आता प्रत्येकाचा फोटो यादीत आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीने दोनदा मतदान करणे आता अशक्य आहे.”
Mumbai, Maharashtra: NCP leader Nawab Malik cast his vote at Michael High School & Junior College, Catholic Education Society, L.B.S. Road in Kurla West for local body polls. He says, “I have exercised my voting right. I appeal to people to come out in large numbers and vote for… pic.twitter.com/hr2S5W51X9 — IANS (@ians_india) January 15, 2026
Maharashtra Election Commission: शाईबाबतचा गोंधळ आणि निवडणूक आयोगाचा खुलासा; तीच शाई, जी लोकसभा…
“दोन ठिकाणी नावे असलेल्या मतदारांना ओळखण्याची सक्षम यंत्रणा आता उभी राहिली आहे. लोकशाहीची शुद्धता राखणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे मलिक यांनी नमूद केले. एका मंत्र्याला मतदानासाठी ३-४ बूथवर फिरावे लागल्याच्या प्रश्नावर मलिक यांनी चिमटा काढला. ते म्हणाले, “जर एवढ्या मोठ्या मंत्र्याला स्वतःचा पोलिंग बूथ माहित नसेल, तर याचा अर्थ त्यांचा पक्ष आणि संघटना पूर्णपणे निष्क्रिय आहे. त्यांनी स्वतःची मतदार यादीच पाहिलेली नाही, हे यातून स्पष्ट होते.”
नवाब मलिक यांनी मुंबईकरांना आवाहन केले की, जर तुम्ही आज घराबाहेर पडून मतदान केले नाही, तर मुंबईची कमान अशा लोकांच्या हातात जाईल ज्यांना जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही. राज्याच्या राजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानापेक्षा मशीनच चर्चेत! PMC निवडणुकीत EVMच्या बिघाडाने लोकशाहीचा खेळखंडोबा”