Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nawab Malik : मुंबईमध्ये अजित पवारांचा भाजपला दे धक्का? नाराजीनंतरही नबाव मलिकांकडे दिले नेतृत्व

राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबईमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. अजित पवारांनी भाजपच्या विरोधात जाऊन नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 17, 2025 | 02:23 PM
NCP Ajit Pawar given Nawab Malik responsibility of leading the party in Mumbai politics

NCP Ajit Pawar given Nawab Malik responsibility of leading the party in Mumbai politics

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई पालिका निवडणुकीसाठी अजित पवारांचा मास्टरप्लॅन
  • अजित पवारांनी दिले नवाब मलिक यांच्याकडे मुंबईचे नेतृत्व
  • मात्र भाजपमधून नाराजीचा सूर
Nawab Malik : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) महापालिका निवडणूका जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली. देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने देखील मुंबईमध्ये (BMC Elections) 50 जागांवर निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपची नाराजी ओढावून घेत नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे. तर शिवसेना ही सत्तेची परंपरा राखण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील मुंबईसाठी राजकीय चाल खेळण्यास सुरुवात केली आहे. मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईच्या निवडणुकीसाठी खास चर्चा करण्यात आली. यामधून 50 जागांवर अजित पवारांचा पक्ष नशीब आजमवणार आहे. तसेच मुंबई पालिका निवडणुकीचे नेतृत्व हे माजी मंत्री नवाब मलिक यांच्याकडे असणार आहे. भाजपच्या विरोधाला बगल देत नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादीने मुंबईची जबाबदारी दिली आहे.

हे देखील वाचा : ज्या घोषणेची उत्सुकता ती लवकरच…! ठाकरे बंधूंची चर्चा अंतिम टप्प्यात, उत्सुकता पोहचली शिगेला

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. मात्र, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने याला कडाडून विरोध केला आहे. ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आम्ही युती करणार नाही, असे मत भाजप नेत्यांनी मांडले आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

त्यासोबतच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीत राहून कमी जागा घेण्यापेक्षा स्वतंत्र लढून आपली ताकद दाखवून द्यावी, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईतील अल्पसंख्याक मतांवर लक्ष केंद्रित करता येईल. जे महायुतीत राहिल्यास कठीण होऊ शकते, असेही बोललं जात आहे.

हे देखील वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले

मुंबईमध्ये सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्ष तयारी करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा हात धरण्याचा निर्णय घेतला आहे. तर कॉंग्रेस पक्षाने महाविकास आघाडीमधून बाहेर पडत मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. त्याचबरोबर अजित पवारांनी देखील मलिकांना संधी देत भाजपची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष राजधानी मुंबईवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Ncp ajit pawar given nawab malik responsibility of leading the party in mumbai politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • BMC Elections
  • Mumbai Politics
  • nawab malik

संबंधित बातम्या

Thackeray Brothers Alliance : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
1

Thackeray Brothers Alliance : निवडणूक जाहीर झाली पण ठाकरे बंधूंची युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.