Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी नगरपंचायत, नगरपरिषदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निरीक्षकांची नियुक्ती; आज ठरवले जाणार उमेदवार

शिवसेना व राष्ट्र‌वादीची निवडणुकीसाठी जवळीक वाढत असताना भाजपने मंगळवारी (दि.११) रात्री अचानक या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. यातही कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. केवळ उमेदवारांची यादी व जागा जाणून घेतल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 13, 2025 | 01:23 PM
राष्ट्रवादी आज ठरविणार उमेदवार

राष्ट्रवादी आज ठरविणार उमेदवार

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यातील अनेक नगरपंचायतींसह नगर परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यात नगरपंचायत आणि नगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अद्याप महायुतीचा तिढा सुटलेला नाही. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने त्यांचे उमेदवार ठरवण्यास सुरुवात केली. गुरुवारी (दि.13) जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी नगराध्यक्ष व नगरसेवकपदांचे उमेदवार जाहीर केले जातील. त्यानंतर 17 नोव्हेंबरपूर्वी महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्यास तिन्ही पक्ष समोपचाराने त्यांचे उमेदवार मागे घेतील, असे ठरविण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायत व नगरपालिकानिहाय निरीक्षकांची नियुक्ती केली. गेल्या तीन दिवसांपासून महायुतीसाठी जिल्ह्यात खलबते सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाने चर्चाच होत नसल्याने त्यांच्या मुलाखती आटोपल्या. राष्ट्रवादीनेही आधीच उमेदवारांचे पॅनल तयार केले. आता त्यांनी गुरुवारी पॅनलमधील सर्वाधिक पसंती असलेल्या उमेदवारांचे नाव जाहीर करण्याची तयारी केली आहे. यासाठी निरीक्षकही जाहीर केले.

याअंतर्गत कामठी नगरपंचायत, बहादुरा, येरखेडा, कन्हान-कांद्री नगरपंचायतसाठी नरेश अडसडे, बेसा-पिपळा, महादुला, कन्हान-पिंपरी, बिडगाव तरोडी खुर्द नगरपंचायतसाठी जिल्हाध्यक्ष डॉ. राजाभाऊ टांकसाळे, मौदा नगरपंचायतसाठी माधुरी पालीवार, उमरेड नगरपरिषद, भिवापूर, कुही नगरपंचायतसाठी श्रीकांत शिवणकर, रामटेक नगरपरिषद, पारशिवनी नगरपंचायतसाठी राजू राऊत यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

बुटीबोरी नगरपरिषदेसाठी विशाल खांडेकर निरीक्षक

काटोल, नरखेड, मोवाड नगरपरिषद व कोंढाळी नगरपंचायतसाठी बाबा गुजर, कळमेश्वर-ब्राम्हणी, मोहपा नगरपरिषदेसाठी करिश्मा चुटे, खापा, सावनेरसाठी सुनीता येरणे, वाडी नगरपरिषद, हिंगणा नगरपंचायतसाठी शहराध्यक्ष अनिल अहिरकर, वानाडोंगरी, डिगडोह (देवी) नगरपरिषद, निलडोह, गोधनी रेल्वे नगरपंचायतसाठी प्रशांत पवार तसेच बुटीबोरी नगरपरिषदेसाठी विशाल खांडेकर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली.

भाजपने घेतली ‘वेट अँड वॉच’ची भूमिका

शिवसेना व राष्ट्र‌वादीची निवडणुकीसाठी जवळीक वाढत असताना भाजपने मंगळवारी (दि.११) रात्री अचानक या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. यातही कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही. केवळ उमेदवारांची यादी व जागा जाणून घेतल्या. जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी बैठकीतील माहिती पक्षाचे राज्य निरीक्षक व महसूलमंत्री बंद्रशेखर बावनकुळे यांना देणार असल्याचे कळविले. चर्चेनंतर यावर तोडगा काढला जाईल, असे संकेतही दिले. यावरून भाजप शेवटपर्यंत सहकारी पक्षांना चर्चेत ठेऊन ‘वेट अँड वॉच’ची भूमिका साकारणार आहे.

हेदेखील वाचा : Local Body Elections 2025: राजकारणाचे माझे वय नाही…; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या नेत्याचे वक्तव्य

Web Title: Ncp appoints inspectors for upcoming nagar panchayats and municipal councils elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nagar Panchayat
  • NCP Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : ‘महायुतीच्या पक्षांसोबत कुठंही आघाडी नाही’; मनसेला सोबत घेणार का? तर सपकाळ म्हणाले…
1

Maharashtra Politics : ‘महायुतीच्या पक्षांसोबत कुठंही आघाडी नाही’; मनसेला सोबत घेणार का? तर सपकाळ म्हणाले…

महायुती तुटण्याच्या मार्गावर? ‘डोक्यावर पडलेले आमदार’; ‘या’ नेत्याच्या टीकेने उडाली खळबळ
2

महायुती तुटण्याच्या मार्गावर? ‘डोक्यावर पडलेले आमदार’; ‘या’ नेत्याच्या टीकेने उडाली खळबळ

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी? भाजपचा ‘एकला चलो रे’चा नारा तर…
3

Maharashtra Politics: महायुतीमध्ये बिघाडी? भाजपचा ‘एकला चलो रे’चा नारा तर…

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच बाळासाहेब थोरात यांना धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
4

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच बाळासाहेब थोरात यांना धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.