Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“अन्यथा कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करणार…; DCM अजित पवारांनी कोल्हापूरात दिली प्रशासनाला तंबी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौरा केला आहे. यावेळी त्यांनी प्रशासकीय कामांचा आढावा घेतला असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 25, 2025 | 01:52 PM
NCP DCM Ajit pawar kolhapur visit Review of administrative work

NCP DCM Ajit pawar kolhapur visit Review of administrative work

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बैठक घेतली असून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये पंचगंगेच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे देखील भरपाई देण्याबाबत सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “कोल्हापुरातील सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेतला असून  कोल्हापूर जिल्हा प्रशासन, लोक प्रतिनिधींनी प्रश्न समजून घेतले आहे. कोल्हापूर महापालिकेला अधिकची 3 एकर देऊन पाच एकर जागा महापालिकेला देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत आयुक्तांनी माहिती देऊन निधीची मागणी केलीय. तो निधी देण्याची कार्यवाही मी करेन. अंगणवाडी इमारत बांधकाम रक्कम वाढवून 15 लाख करण्याबाबत माहिती घेऊन मान्यता देण्याच्या सूचना दिल्या. पन्हाळ्यावरील काही कामांना गती देण्याचे ठरवले आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे अजित पवार म्हणाले की, “क्रीडा संकुल जलतरण तलावाबाबत निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आहे तो जलतरण तलाव दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी कोल्हापूर विमानतळ 3 किमी धावपट्टी करण्याबाबत चर्चा केली. सर्किट बेंच झाल्यामुळे विमानतळाच्या सुविधा सुधारण्याची गरज आहे. सारथी उपकेंद्र कोल्हापूर आहे, त्याबाबत निधी वेळेत येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच अंबाबाई मंदिर परिसर संवर्धन आणि विकास आराखडा 143 कोटींच्या कामाचं अंदाजपत्रक करण्याचं काम चालू आहे. जोतिबा देवस्थान 81 कोटींच्या कामाचं अंदाजपत्रक करण्याचं काम चालू आहे,” असे देखील अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्याबाबत सांगितले आहे.

पुढे अजित पवार यांनी कंत्राटदारांना दर्जैदार काम करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अजित पवार म्हणाले की, “कोल्हापूर शहराजवळ होणाऱ्या पुलावेळी भराव टाकण्याऐवजी इतर गोष्टी करण्याच्या गोष्टी नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. तसचं टेक्निकलबाबी तपासल्या पाहिजेत. त्याबाबत सरकारने अनेक काही गोष्ठी ठरवल्या आहेत. दर्जेदार कामं झाले पाहिजेत अन्यथा कंत्राटदार ब्लॅकलिस्ट करण्यास मी सगळीकडे सांगतो. मी आयुक्तांना सांगितले आहे की रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत,” अशी तंबी दिली असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे गणेशोत्सवामुळे लवकर होणार आहे. याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणाले की, “गणेशाचं आगमन काहीच दिवसांत होत आहे, दरवेळी महिन्याचा पगार 1 तारखेला देत असतो. मात्र यावेळी गणेशोत्सव असल्याने उद्याच वेतन देण्याचा आदेश काढत आहे. यंदा 26 तारखेला सर्वांचे वेतन जाईल याचा वित्त विभागाकडून आदेश काढला जाईल,” अशी माहिती अर्थमंत्री तथा गृहमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Web Title: Ncp dcm ajit pawar kolhapur visit review of administrative work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • ajit pawar
  • kolhapur news
  • political news

संबंधित बातम्या

अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
1

अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

Gokul Result 2026 : गोकुळमध्ये सतेज पाटील यांची बाजी! 13-12 च्या निकालात कोण जिंकलं? पाहा संपूर्ण यादी
2

Gokul Result 2026 : गोकुळमध्ये सतेज पाटील यांची बाजी! 13-12 च्या निकालात कोण जिंकलं? पाहा संपूर्ण यादी

KOLHAPUR News: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल
3

KOLHAPUR News: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना…
4

राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; तर तरुण आमदारांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.