NCP Dhnanjay munde press live mumbai on beed Sexual assault case and Sandeep Deshpande accused
Dhananjay Munde in Monsoon Session : मुंबई : मागील काही महिन्यांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे हे जोरदार चर्चेमध्ये आले होते. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसोबत संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून आता धनंजय मुंडे हे आक्रमक भूमिका घेताना दिसले आहेत.
माजी मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे विधीमंडळामध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे म्हणाले की, “बीडमधील एका लहान मुलीवर लैगिंक अत्याचार करण्यात आला. सलग एक वर्ष या मुलीवर अत्याचार होत होता. ज्या कोचिंग क्लॉसमध्ये ती जात होती तिथेच तिच्यावर अत्याचार सुरु होता. कोचिंगच्या मालकांनी आणि त्यांच्या पार्टनरने हा लैगिंक अत्याचर तिच्यावर केला. या दोघांवर राजकीय वरदहस्त आहे. हे लोक बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत,” असा गंभीर दावा आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “आरोपींसोबत राजकीय वरदहस्त आहे. हे त्यांनी मिळून केलेले कारस्थान आहे. ज्यावेळेस हे पहिलं प्रकरण समोर आलं त्यावेळेस पीडित कुटुंबाला आमचं नावं कुठेही पुढे येऊ देऊ नका..आम्ही सुद्धा यामधील पीडित आहोत. ते आम्हाला हुंदके देत ही घटना सांगत होते,” असे मत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे म्हणाले की, “ज्या घरामध्ये संदीप क्षीरसागर राहतात त्या घराचा मालक कोण आहे हे शोधून काढा. पत्रकार मागील काही दिवसांपूर्वी बीडला अनेक दिवस येऊन राहिले. आता बीडमधील संदीप क्षीरसागर यांच्या घराचा मालक शोधावा. असे प्रकार पुन्हा महाराष्ट्रामध्ये घडू नये म्हणून कमीत कमी हे शोधावं. आज पीडित कुटुंबाला पुढे येऊन सांगितलं तर घरं उद्धवस्त होईल याची भीती वाटते,’ असा दावा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
“या घटनेतील पीडित मुलींच्या आई वडीलांनी आता आपलं सगळं संपलं आहे आता आपण आत्महत्या करावी असा विचार केला होता. हे जेव्हा त्या मुलीने ऐकलं त्यावेळेस त्या मुलीने पोलीस स्टेशनला येऊन हा प्रकार सांगितला आहे. तीन दिवसांपूर्वी तिने हे पुढे येऊन सांगितलं नसतं तर तिघेही जीवंत राहिले नसते. पोलीस म्हणतात की आम्ही अगदी व्यवस्थितपणे तपास करु. पोलिसांनी सुद्धा पोक्सोसारख्या प्रकरणामध्ये दोन दिवसांची पीसीआर मागावी?” असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.