Jitendra Awhad shared the video of capturing the Parli booth and committing hooliganism
परळी : राज्यामध्ये सध्या बीड हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घुण हत्येमुळे राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे बीड व परळीमधील कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे. परळीमध्ये अनेक गुंडाची दहशद असल्याचा दावा देखील केला आहे. या संदर्भात सत्ताधारी भाजप पक्षातील नेते सुरेश धस यांनी गंभीर असे आरोप करुन मुंडे बंधू भगिनींवर निशाणा साधला आहे. यानंतर आता शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बीडमधील हत्या प्रकरण उचलून धरले आहे. या प्रकरणासंदर्भात अनेक धक्कादायके दावे करुन त्याचे पुरावे त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानकेंद्राबाहेर गुंडाचा वापर केला गेला असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर पोलिसांचा देखील धाक परळीमध्ये राहिलेला नसून पोलिसांना देखील धमकावले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मतदानकेंद्राबाहेर गाडी आणण्यास परवानगी नसताना देखील चारचाकी गाडी आत घेऊन आलेले असून 15 ते 20 तरुण दमदाटी करत आहेत. यावेळी ते धनंजय मुंडे यांच्या नावाचा गजर करत असून मतदानकेंद्राबाहेर घोषणाबाजी करत आहेत. तसेच हे जमलेले तरुण इतरांना आतमध्ये जाऊन देखील देत नसल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या जमावाला पोलिसांचा देखील धाक राहिलेला नाही. जमाव पोलिसांवर आरेरावी करत असून पोलिसांचा एकेरी उल्लेख करत आहे. यावरुन परळीमधील परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संपूर्ण हिंसक मार्गाने हत्यारे, गुंड आणि ताकतीच्या जोरावर पूर्णपणे बूथ कॅपच्यर, विरोधक उमेदवाराला दमदाटी मारहाण, उमेदवाराच्या अंगरक्षक पोलिसालाही दमदाटी आणि धमकी, मतदारांना मतदान करताना अडकाटी व मारहाण, विरोधक उमेदवाराच्या समर्थकांना मारहाण, मतदान कोणी करायचे आणि कोणी नाही करायचे… pic.twitter.com/qhUVssvHQV
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2025
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, संपूर्ण हिंसक मार्गाने हत्यारे, गुंड आणि ताकतीच्या जोरावर पूर्णपणे बूथ कॅपच्यर, विरोधक उमेदवाराला दमदाटी मारहाण, उमेदवाराच्या अंगरक्षक पोलिसालाही दमदाटी आणि धमकी, मतदारांना मतदान करताना अडकाटी व मारहाण, विरोधक उमेदवाराच्या समर्थकांना मारहाण, मतदान कोणी करायचे आणि कोणी नाही करायचे हेच ठरवणार, विरोधी उमेदवाराला मतदान करेल असा थोडासा जरी संशय आला तरी मतदाराला मारहाण करून हाकालपट्टी. अशा निवडणुका तर पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा दक्षिण कोरियामध्ये सुद्धा होत नसतील परळी बूथ ताब्यात घेण्याचा अजून एक पुरावा, असे लिहित जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच कारवाईची मागणी देखील केली आहे.