संतोष देशमुख हत्या आरोपी वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचे समोर आले (फोटो - सोशल मीडिया)
सोलापूर: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सध्या खंडणी प्रकरणात सध्या सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडचा संबंध असल्याचे पुरावे समोर येऊ लागले आहेत. हा घटनाक्रम सुरू असतानाच आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडदेखील अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सुशील कराडवर खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या मॅनेजरने गंभीर आरोप केले आहेत. सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीनेच सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे.
Todays Gold Price: सोन्या – चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! काय आहेत आजचे दर
इतकेच नव्हे तर, सुशील कराडचे साथीदार अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरूद्धही खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच पिडीत मॅनेजरच्या पत्नीने सुशील कराडसह त्याच्या दोन्ही साथीदारांविरोधात सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली होती. पण त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली गेली नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळयानंतर पिडीत मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करत या तिघांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मॅनेजरच्या पत्नीने केलेल्या आरोपांवर आरोपींनीही त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. 13 जानेवारीला याप्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुशील कराडवर केलेल्या आरोपांबाबत न्यायालय काय निर्णय देते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शॉपिंगसाठी तयार आहात ना? या दिवशी सुरू होतोय Flipkart चा Republic Day स्पेशल
त्याचवेळी बीड खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या कोठडीत वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सुदर्शन घुलेबाबत एसआयटीच्या तपासात मोठा पुरावा हाती लागला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तीन दिवस आधी म्हणजे 6 डिसेंबरला सुदर्शन घुले वाल्मिक कराड यांच्यात दोनदा फोनवरून बोलणे झालं होतं. मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला पहिला कॉल केला होता. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर घुले आणि कराडचे फोनवरून दुसरे संभाषण झाल्याची माहिती आहे.