File Photo : Eknath Shinde
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोणत्याही क्षणी महापालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय खलबतं सुरू असताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान आज नाशिकमध्ये माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
राज्यातील अनेक तालुक्यांमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इतर पक्षातील नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. अलिकडेच नवी मुंबईतील ठाकरे गटाचे जिल्ह्याध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितित मुंबईत त्यांनी हा प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Gadchiroli Police: नक्षवाद्यांना मुख्य प्रवाहात आणलं..; गडचिरोली पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बळ वाढल्याची चर्चा आहे. तसेच आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
दोन वर्षांपूर्वी शिवसेनेट फुट पडली. एकनाथ शिंदे आणि 50 आमदार भाजपसोबत महायुतीमध्ये सामील झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांनी पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यानंतर लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने एकनाथ शिंदे यांच्यावर जास्त विश्वास दर्शवला असल्याचे पाहायला मिळाले. मात्र शिवसेना फूटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती अजूनही थांबताना दिसत नाहीये. कारण राज्याच्या विविध भागातील ठाकरेंच्या पदाधीकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ठाण्याच्या आनंद आश्रमात ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवनेतील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ठाणे, भिवंडी, शहापूर, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभेत शिवसेनेचे 60 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणती आहे त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. आता मी उपमुख्यमंत्री आहे. आता स्थानिक पातळीवर भगवा फडकवायचा आहे. मला अनेक शिव्या, श्राप दिल्या. पण कामातून उत्तर दिले.