Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 10 प्रवक्त्यांची नवी टीम जाहीर; जितेंद्र आव्हाडांसह ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, महेबूब शेख यांच्यासह दहा नेत्यांचा यात समावेश असून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

  • By विवेक
Updated On: Aug 29, 2026 | 07:54 PM
Sharad Pawar

Sharad Pawar

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 10 प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर
  • जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, महेबूब शेख यांचा समावेश
  • राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका मांडणार
मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून तब्बल 10 प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी या प्रवक्त्यांवर असणार आहे.

राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक

प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यापूर्वी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

बैठकीला माजी मंत्री जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर पक्षाकडून नव्या प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली.

Amit Shah–Eknath Shinde Meeting : अमित शाह-एकनाथ शिंदेंमध्ये विमानतळावर 10 मिनिटं चर्चा; शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीवर खलबतं?

राष्ट्रवादीचे 10 प्रवक्ते कोण?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलेल्या नव्या यादीत जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.

या नेत्यांवर पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय मुद्द्यांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची भूमिका मांडताना या नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

यापूर्वीच्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द

दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यापूर्वी केलेल्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. 4 ऑगस्ट 2026 रोजी यासंदर्भातील पत्र पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले होते.

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

या निर्णयानंतर माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडतील, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.

आता पक्षाने नव्याने 10 प्रवक्त्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पक्षाच्या मीडिया स्ट्रॅटेजीमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या नव्या प्रवक्त्यांवर पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

Web Title: Ncp sharad pawar 10 new spokespersons jitendra awhad party list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.