Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी काढणार; प्रा. लक्ष्मण हाके यांची महत्त्वपूर्ण घोषणा

सध्या ओबीसींच्या बाजूने खासदार, आमदार अथवा सत्ताधारी व विरोधक देखील बोलायला तयार नाहीत. पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसींच्या बाजूने कोणीही बोलले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 21, 2026 | 01:41 PM
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी काढणार; प्रा. लक्ष्मण हाके यांची घोषणा

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी काढणार; प्रा. लक्ष्मण हाके यांची घोषणा

Follow Us
Follow Us:

बारामती : ओबीसींच्या न्याय हक्कासाठी ओबीसी जनता पार्टी हा पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. भाजप हा आता उद्योजकांचा पक्ष झाला असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली.

बारामती दौऱ्यावर आल्यानंतर प्रा. हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसींना न्याय देण्यासाठी त्यांचा हक्काचा पक्ष असावा, यासाठी आपण ओबीसी जनता पक्षाची स्थापना करणार असून, आगामी निवडणूक ओबीसी जनता पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहे. ओबीसी ही भाजपची परंपरा आहे, म्हणून त्यांनी ओबीसींची मते घेतली. मात्र, भाजपचा मूळ ढाच ओबीसींचा राहिला नसून तो उद्योजकांचा झाला आहे. ओबीसींच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण या पक्षाची स्थापना करणार आहोत.

सध्या ओबीसींच्या बाजूने खासदार, आमदार अथवा सत्ताधारी व विरोधक देखील बोलायला तयार नाहीत. पावसाळी अधिवेशनामध्ये ओबीसींच्या बाजूने कोणीही बोलले नाही. राज्यातील ओबीसींच्या प्रश्नावर एकही आमदार जर अधिवेशनात बोलत नसेल तर हे मोठे दुर्दैव आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत देखील कोण बोलत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील ६० % ओबीसींनी करायचे काय?, असा सवाल व्यक्त करत हाके म्हणाले.

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

सत्ताधाऱ्यांच्या सत्तेचा राजमार्ग आमच्या वाड्यावस्त्यावरून जात असेल, मात्र प्रत्यक्षात ओबीसींच्या बाजूने कोणीही बोलायला तयार नसेल तर ओबीसींना न्याय देणारा कोण नाही, अशी भावना ओबीसींमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसी स्वतःच्या प्रश्नावर स्वतः काम करतील. याच दृष्टिकोनातून आपण ओबीसी जनता पार्टीची स्थापना करणार असल्याचे हाके यांनी यावेळी सांगितले. यावेळी बापूराव सोलनकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी

कोकणातील महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक संघर्षात आता मंत्री योगेश कदम यांनी उडी घेत ‘आता नो कॉम्प्रोमाईज’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.

Web Title: Obc janata party to be launched for the just rights of obcs says laxman hake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Laxman hake
  • OBC Reservation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.