'दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले...' भाजप नेता पुन्हा बरळला,
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या CJP (कॉकरोच जनता पार्टी) च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांनी जंतर-मंतरवरून संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संसद परिसरातील सुरक्षा लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. आरपीएफचे जवान आणि पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.यावरून आता देशभरातून मोठ्या प्रतिक्रिया येत असून अश्यातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा या आंदोलनावर टीका करत मुक्ताफळे उधळली आहेत. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर टीका करत “दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवलेले आहेत,” अश्या शब्दांत टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवलेले आहेत. संसदेत शिरायचं असेल तर निवडणुका लढा आणि शिरा, इथे घुसखोरी केलीत तर पोलीस प्रसाद देणारच.”
लोकशाहीच्या नावाखाली लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवलेले आहेत. संसदेत शिरायचं असेल तर निवडणुका लढा आणि शिरा, इथे घुसखोरी केलीत तर पोलीस प्रसाद देणारच. — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 20, 2026
एकीकडे आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईबाबत देशभरात संतापाचे वातावरण असताना अतुल भातखळकरांच्या विधानाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. NEET पेपर फुटीनंतर 20 हुन अधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान कारणीभूत असून त्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामाँ द्यावा यासाठी विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.
याआधीही भातखळकरांनी CJP चे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांच्यावर टीका केली होती. त्यात ते म्हणाले, “अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत. बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेलं आहे.”
कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत.
बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने… — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 19, 2026
अतुल भातखळकरांच्या वक्तव्याला आता मोठा विरोध होत असून लोकशाही मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचे तसेच लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा आणि राजीनाम्याची मागणी करण्याचाही अधिकार संविधानाने दिला असल्याचे मत लोक व्यक्त करत आहेत.
‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात






