Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Tiger : ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात करणार शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश

ठाकरे गटातील सहा खासदार आज अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन टायगर (Operation Tiger) यशस्वी झाल्याची चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली.

  • By विवेक
Updated On: Jun 22, 2026 | 03:28 PM
Operation Tiger : ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात करणार शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश

Operation Tiger : ठाकरेंचे फुटीर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात करणार शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे गटाचे 6 खासदार आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता.
  • खासदारांचे मुंबईत आगमन; नंदनवन येथे महत्त्वाची बैठक.
  • संजय राऊतांचा बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल
 

Operation Tiger : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालवलेले ऑपरेशन टायगर यशस्वी झाले आहे. शिवसेनेच्या सहा खासदाराना फोडण्यात त्यांना यश आले असून आज (सोमवार, 22 जून) हे सहाही खासदार अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा करणार आहेत. यासाठीच आज खासदारांचे आज मुंबईत आगमन झाले असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी पोहोचणार आहेत.

Y प्लस सुरक्षेसह हे खासदार उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. खासदार संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि नागेश पाटील आष्टीकर आज दुपारी दिड वाजता विशेष विमानाने मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. यानंतर ते आपल्या खाजगी वाहनाने नानादानवांच्या दिशेने निघतील. ओमराजे निंबाळकर धाराशिवमधून मुंबईच्या दिशेने पोहोचतील तर संजय दिना पाटील हे मुबईतच असल्याने तेदेखील थोड्याच वेळात पोहोचतील.

MLC Election Result 2026: महायुतीचा ऐतिहासिक विजय तर महाविकास आघाडीचा धुव्वा; कुठे पाच तर कुठे चक्क शून्य मतदान !

संजय राऊतांची जोरदार टीका

फुटीर खासदार मुंबईत आल्यानंतर शिवसेना थगकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून चांगलाच निउष्ण साधला आहे. ते म्हणाले, “50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले. ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल. मेरा बाप गद्दार था. मेरा पती गद्दार था. मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र!” असे म्हणत त्यांनी या खासदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले
आणि भेदरलेल्या नजरेने
शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले
ये जिना भी क्या जिना है लल्लू?
चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे!
ह्यांची पुढील पिढी सांगेल
मेरा बाप गद्दार था
मेरा पती गद्दार था
मेरा नाना…
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2026

कृष्णा नागेश पाटील अष्टेकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी

नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज (22 जून 2026) जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाचे (BJP) आणि महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांनी दणदणीत विजय मिळवला. मतदान केलेल्या ४५२ सदस्यांपैकी ४५१ जणांना ३३९ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि महाविकास आघाडीचे (एमव्हीए) अपक्ष उमेदवार आणि बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्ण नागेश पाटील अष्टिकर यांना केवळ ८४ मतांवर समाधान मानावे लागले.

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

निकाल जाहीर होताच, ठाकरे गटाने एक मोठे पाऊल उचलले आणि कृष्ण पाटील अष्टिकर यांना पक्षातून काढून टाकले. कृष्णा नागेश पाटील (अष्टेकर ) यांची पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टिकर यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. बंडखोरी होऊनही, कृष्णा नागेश पाटील अष्टिकर यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता निकाल स्पष्ट झाला असून, अष्टिकर यांचा पराभव झाला आहे.

Web Title: Operation tiger success six thackeray group mps join shinde shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Operation Tiger

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
4

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.