MLC Election Result 2026: महायुतीचा ऐतिहासिक विजय तर महाविकास आघाडीचा धुव्वा; कुठे पाच तर कुठे चक्क शून्य मतदान !
MLC Election Result 2026 : विधान परिषद निवडणुकांच्या निकालाने राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले असून 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत सुमार राहिली असून फक्त एका जागेवर यश मिळवता आले आहे. या निवडणुकीतला महाविकास आघाडीचा हा सर्वात वाईट पराभव मानला जात असून कुणाला 5 मते तर कुणाला चक्क शून्य मते पडली आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुमार कामगिरी केली आहेच पण राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलादेखील अत्यंत निराशाजनक कामगिरी करवून अपयशाला सामोरे जावे लागले आहे.
सोलापूर विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 616
राजेंद्र राऊत (भाजप) – 483
वसंतराव देशमुख (शरद पवार गट) – 118
जळगाव विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 630
नंदकुमार महाजन (भाजप) – 577
शरद तायडे (ठाकरे गट) – 5
सांगली सातारा विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 895
धैर्यशील कदम (भाजप) – 591
अभयसिंह जगताप (शरद पवार गट) – 295
नांदेड विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 452
अमर राजूरकर (भाजप) – 339
कृष्णा आष्टीकर (ठाकरे गट) – 84
भंडारा गोंदिया विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 457
अविनाश ब्राह्मणकर (भाजप) – 304
नरेश ईश्वरकर (मविआ पुरस्कृत) 152
अमरावती विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 451
डॉ. प्रवीण पोटे (भाजप) – 390
निलेश विश्वकर्मा (वंचित बहुजन आघाडी) – 31
हर्षजीत देशमुख (काँग्रेस) – 0
धाराशिव – लातूर – बीड विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 958
बसवराज पाटील (भाजप) – 845
महेश देशमुख (काँग्रेस) – 124
छत्रपती संभाजीनगर – जालना विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 637
सुहास शिरसाट (भाजप) – 454
गणेश लोखंडे (ठाकरे गट) 134
नागपूर विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 836
डॉ. राजीव पोतदार (भाजप) – 682
अतुल लोंढे (काँग्रेस) – 130
परभणी – हिंगोली विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 466
सईद खान (शिवसेना) – 242
डॉ. विवेक नावंदर (ठाकरे गट) – 159
नाशिक विधानपरिषद मतदारसंघ
एकूण मतदार – 619
गोकुळ गीते (अपक्ष) – 357
नरेंद्र दराडे (शिवसेना) – 248
प्राजक्त तनपुरे (भाजप) – अहिल्यानगर विधानपरिषद मतदारसंघ
अरुण लखानी (भाजप) – वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली विधानपरिषद मतदारसंघ
रवींद्र फाटक (शिवसेना) – ठाणे – पालघर विधानपरिषद मतदारसंघ
दूष्यांत चतुर्वेदी (शिवसेना) – यवतमाळ विधानपरिषद मतदारसंघ
विक्रम काकडे (राष्ट्रवादी) – पुणे विधानपरिषद मतदारसंघ
अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) – रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघ






