फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा वारसा विसरू नका'; अभिजीत दिपकेंचे आवाहन
CJP Protest Against Gyanesh Kumar Live: या आंदोलनातून महात्मा गांधींना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. आपल्या अधिकारांसाठी लढणं हेच गांधींजींना वंदन आहे. महात्मा गांधी यांना इंग्रजांनी जितका त्रास दिला नव्हता, इतका त्रास या संघी लोकांनी आपल्याला दिला आहे. पण गांधी कधी मरू शकत नाही, गांधी या देशाचा आत्मा आहे. अशी टिका सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPकडून मुंबईत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या गेट क्रमांक ६ जवळ सीजेपीने आज (२ ऑक्टोबर) पासून आंदोलन सुरू झाले आहे.
अभिजीत दिपके म्हणाले की, गोडसेंसारखे हजारो लोक येतील आणि जातील, गोडसेसारखे लोक भित्रे आहेत. पण गांधी या देशाचा आत्मा आहे. हा देश गांधींच्या विचारांचा आहे. गोडसेंच्या विचारधारेच्या लोकांना मी सांगू इच्छितो की , गांधींना कोणी संपवू शकत नाही. पण कोणीतरी येऊन सांगेन की, पण एक महाभाग स्वत:ला नॉनबायोलॉजीकल म्हणवतो, आम्हाला माहितीये तुम्ही माणूस नाही आहात. गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्याशी तुलना करण्याची यांची लायकी पण नाही. गांधी कधीही संपणार नाही.
जर गांधी या देशाचा आत्मा आहेत तर आंबेडकर या भारताच्या पाठीचा कणा आहेत. तर जवाहरलाल नेहरू हे देशाचे मन आहेत. त्यांच्याशी तुमची तुलना होऊच शकत नाही. पण हे लोक आज काय करत आहेत. निवडणूक जिंकून तुम्ही त्यांच्याहून मोठे होऊ शकत नाहीत. गांधी, नेहरू, आंबेडकर हे देशासाठी त्याग करून, आंदोलने करून मोठे झाले होते. ज्यांना त्यांचे अधिकारही माहिती नव्हते त्यावेळी यांनी त्या लोकांना त्यांचे अधिकार दिले. पण आजचे हे सरकार देशातील नागरिकांचे अधिकार हिसकावू लागले आहेत. तुम्ही देशाला अजून किती लुटणार आहात. नोटबंदी, कोरोना मध्ये देशातील नागरिकांना रस्त्यावर रांगेत उभे केले, अशी टिकाही दिपके यांनी केली.
Abhijeet Dipke Viral Video: ‘चला, चहा घेऊ…’ म्हणत मुंबई पो
यावेळी बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. प्रोटेस्टला जाल तर तीन दिवस जेलमध्ये जावे लागेल, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. या महाराष्ट्राला एक पंरपरा आहे. फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा वारसा विसरू नका. तुम्ही विसरले असाल आम्ही नाही. फडणवीस साहेब तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकायचं होतं ना. आता टाका आम्हाला जेलमध्ये. असे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले.
या देशात जनता सरकारची निवड करते. पण या नॉनबायोलॉजिकल महामानवाच्या मते, सरकार ठरवणार त्यांचे मतदार कोण असतील आणि नसतील. पण हेच जर आधीच्या सरकारने केले असते तर तुम्ही आजही चहाच्या दुकानात चहा विकला असता.






