Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pradeep Purnekar Case : ज्यांच्यावर आरोप झाले, त्याच मिनाक्षी शिंदेंनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लिहिलं पत्र!

Pradeep Purnekar Case : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी मोठं पाऊल उचललं आहे. राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण वाढवून देण्याची मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 03, 2026 | 05:28 PM
ram purnekar meenakshi shinde

ram purnekar meenakshi shinde

Follow Us
Follow Us:
  • प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदेंचं मोठं पाऊल
  • पोलीस आयुक्तांना पत्र लिहून केली संरक्षणाची मागणी
  • राम पूर्णेकर आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
 

ठाणे : ठाण्यातील मानपाडा परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे यांच्यावर पूर्णेकर कुटुंबीयांकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्या अटकेची मागणीही केली जात आहे. अशातच आता मिनाक्षी शिंदे यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. (Pradeep Purnekar Case) 

प्रदीप पूर्णेकर यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय न्यायाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. राम पूर्णेकर यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी आंदोलन करत या प्रकरणातील संशयितांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आता मिनाक्षी शिंदे यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षातील काही नेते या दुःखद घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे ठाण्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

Dia Mirza Controversy : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून भाजप नेत्यांना हायकोर्टाचा दणका! मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

राम पूर्णेकर यांच्या सुरक्षेसाठी मोठी मागणी

या पत्रातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मिनाक्षी शिंदे यांनी राम पूर्णेकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे. राजकीय विरोधकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडवला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे राम पूर्णेकर, पूर्णेकर कुटुंबीय तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पोलीस संरक्षणात तातडीने वाढ करावी, अशी विनंतीही पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

विरोधी नेत्यांवरही मिनाक्षी शिंदेंचे आरोप

आपल्या पत्रात मिनाक्षी शिंदे यांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे यांच्यासह इतर विरोधी नेत्यांचा उल्लेख केला आहे. या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसंच, पत्रकार परिषदेत काही जामिनावर असलेले आरोपी उपस्थित असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एकीकडे पूर्णेकर कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी सुरू आहे, तर दुसरीकडे मिनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे या हत्या प्रकरणाला आता नवं राजकीय वळण मिळालं असून, पोलीस प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Pratap Sarnaik : सरनाईकांविरोधात भाजपचे आंदोलन; शिवसेना महिला आघाडीने आरसे दाखवत दिले प्रत्युत्तर!

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदे यांनी काय मागणी केली आहे?

    Ans: मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून राम पूर्णेकर, त्यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण वाढवून देण्याची मागणी केली आहे.

  • Que: मिनाक्षी शिंदे यांनी कोणाकोणाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली?

    Ans: राम पूर्णेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह दिनेश पवार, अखिलेश पाल, प्रशांत मोटे, आनंद भोईर, किसान तट्टे आणि विवेक पांढरे यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

  • Que: मिनाक्षी शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर काय आरोप केले?

    Ans: विरोधी पक्षातील नेते प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असून, चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे.

Web Title: Pradeep purnekar case minakshi shinde police protection demand vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • Meenakshi Shinde
  • Pradeep Purnekar
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
1

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

Thane News: ठाण्यातील १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये जमा
2

Thane News: ठाण्यातील १५ कंत्राटी सफाई कामगारांना दिलासा; थकीत वेतनासह ७.५६ लाख रुपये जमा

Pradeep Purnekar Case : दोन्ही शिवसेनेत जुंपली! नरेश म्हस्के यांची आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी, दिशा सालियन प्रकरणावरून घेरलं
3

Pradeep Purnekar Case : दोन्ही शिवसेनेत जुंपली! नरेश म्हस्के यांची आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी, दिशा सालियन प्रकरणावरून घेरलं

Meenakshi Shinde: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण! मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा
4

Meenakshi Shinde: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण! मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.