Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

Thane Mahayuti Rally : ठाण्यात महायुतीच्या लोकतंत्र बचाव यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत काँग्रेस आणि चीनच्या डोनेशनचा मुद्दा उपस्थित केला.

  • By विवेक
Updated On: Nov 01, 2026 | 02:18 PM
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यात महायुतीच्या लोकतंत्र बचाव यात्रेला जोरदार प्रतिसाद
  • फडणवीसांचा राहुल गांधींवर थेट निशाणा
  • ‘दारू तीच, फक्त बॉटल बदलली’; राहुल गांधींवर बोचरी टीका
 

ठाणे : देशभरात आज (रविवार, 1 नोव्हेंबर) राजकीय आंदोलनांमुळे वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे दिल्लीत INDIA आघाडीचं ‘चलो दिल्ली’ आंदोलन सुरु असताना ठाण्यात महायुतीकडून ‘लोकतंत्र बचाव’ यात्रा पार पडली. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. (Thane Mahayuti Rally)

ठाण्यात महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकतंत्र बचाव’ आंदोलनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विशेष म्हणजे, काँग्रेसला चीनकडून डोनेशन कसं मिळतं, असा थेट सवाल करत फडणवीसांनी नव्या राजकीय वादाला तोंड फोडलं आहे.

ठाण्यात महायुतीच्या लोकतंत्र बचाव यात्रेला जोरदार प्रतिसाद

ठाण्यात आयोजित या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. या आंदोलनाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक आयुक्तांवर ६ गंभीर आरोप! मल्लिकार्जुन खर्गेंनी मांडला महाभियोगाचा प्रस्ताव

फडणवीसांचा राहुल गांधींवर थेट हल्लाबोल

सभेत बोलताना फडणवीसांनी राहुल गांधींच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. विरोधकांकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चांमुळे संविधानाने निर्माण केलेल्या महत्त्वाच्या संस्थांची प्रतिमा मलिन केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी काँग्रेसला चीनकडून मिळणाऱ्या कथित आर्थिक मदतीचा मुद्दा उपस्थित केला. चीनकडून काँग्रेस आणि संबंधित ट्रस्टला डोनेशन का मिळतं, असा सवाल त्यांनी राहुल गांधींना केला. चीनच्या पैशांच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

फडणवीसांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीचा संदर्भ देत राहुल गांधींवर टीका केली. ‘दारू तीच आहे, फक्त बॉटल बदलली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टोला लगावला.

लाल संविधानाच्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरलं

लाल संविधानाचा वापर हा केवळ मुखवटा असल्याचा दावा करत फडणवीसांनी विरोधकांवर संस्थांना बदनाम केल्याचा आरोप केला. आरबीआय, सीएजी, संसद आणि निवडणूक आयोगासह न्यायव्यवस्थेवर होणाऱ्या टीकेवरही त्यांनी आक्षेप घेतला.

एकंदरीत, ठाण्यातील या आंदोलनातून महायुतीने विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. फडणवीसांच्या चीन डोनेशनविषयक आरोपांमुळे आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: ठाण्यात लोकतंत्र बचाव आंदोलन कोणी आयोजित केलं?

    Ans: ठाण्यात महायुतीच्या वतीने लोकतंत्र बचाव पदयात्रा आणि आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं.

  • Que: देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर काय आरोप केले?

    Ans: फडणवीस यांनी काँग्रेस आणि संबंधित ट्रस्टला चीनकडून कथित डोनेशन मिळत असल्याचा सवाल उपस्थित केला. तसेच देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

  • Que: ठाण्यातील लोकतंत्र बचाव यात्रेत कोणते नेते सहभागी झाले होते?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक आणि महायुतीमधील इतर नेते या यात्रेत सहभागी झाले होते.

Web Title: Thane mahayuti rally devendra fadnavis slams rahul gandhi vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Mahayuti
  • Rahul Gandhi
  • Thane news

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी
1

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर
2

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला
3

चादरी विक्रेते बनून गावात फिरले, बँकेची रेकी केली अन्…; गावकऱ्यांच्या धाडसामुळे दरोड्याचा डाव फसला

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु
4

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेससह इंडिया आघाडीकडून आज काढली जाणार रॅली; गर्दी जमणे झाले सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.