Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द ; ऐनवेळी नेमका का निर्णय बदलला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार होते. मागील अनेक दिवसांपासून या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु होती. मात्र पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. शहराला ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला असताना नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 26, 2024 | 11:20 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; मुख्यमंत्र्यांसह परराष्ट्रमंत्री, रेल्वेमंत्रीही राहणार हजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; मुख्यमंत्र्यांसह परराष्ट्रमंत्री, रेल्वेमंत्रीही राहणार हजर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.26) पुणे दौऱ्यावर येणार होते. शहरातील महत्त्वकांशी अशा नव्या मेट्रो लाईनचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी भाजप श्रेष्ठी हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. मागील दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुण्यामध्ये येणार होते. त्यामुळे महायुतीसाठी पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानण्यात येत होता. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर परशूराम महाविद्यालय मैदानावर होणार होता. आता मात्र हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

पुणे शहरातील मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस.पी. कॉलेजवर जाहीर सभा होणार होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पुणे शहराला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आला असून याआधी सभेचे ठिकाण बदलण्याची तयारी सुरु होती. आता मात्र दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रमच…

पुणे शहरामध्ये दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. काल सायंकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना अगदी नदीचे स्वरुप मिळाले होते. वाढत्या पावसामुळे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली. पुण्यामध्ये सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढतो आहे, याचा फटका आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला देखील बसला आहे. सध्या पावसाची एकूणच परिस्थिती लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.  एस.पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार होती. या ठिकाणी मैदानावर मोठा चिखल झाला आहे. तसेच यामुळे नागिरकांची देखील मोठी गैरसोय सभेला झाली असती. यामुळे प्रशासनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याचे सांगितले आहे.

भाजपकडून जोरदार तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्यामध्ये पूर्वनियोजित दौरा होता. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी देखील करण्यात आली होती. शहरातील विविध भागांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे पोस्टर आणि बॅनर्स झळकत होते. त्याचबरोबर नव्याने तयार करण्यात आलेली मेट्रो स्टेशन देखील सजली होती. स्वारगेट, मंडई आणि सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनला फुलांनी सजवण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पुणे दौरा पदाधिकारी आणि इच्छुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यावर आणि पदाधिकाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.

Web Title: Prime minister narendra modi pune visit cancel due to heavy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 10:39 AM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • Pune
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
2

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
3

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
4

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.