Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अमित शाह नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या’; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप, ‘शाह यांनी संसदेत येऊन स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी

जंतर-मंतर आंदोलन आणि बिहारमधील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांवरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. सभागृहात येऊन प्रश्नांची उत्तरं देण्याचे आव्हान देत त्यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Aug 14, 2026 | 06:37 PM
Pruthviraj Chavhan on Amit Shah

Pruthviraj Chavhan on Amit Shah

Follow Us
Follow Us:
  • जंतर-मंतर आंदोलनातील लाठीचार्जवरून पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
  • बिहारमधील कथित AK-47 प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
  • अमित शाह यांनी संसदेत येऊन स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी
 

मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन, आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज आणि बिहारमधील आंदोलनादरम्यान समोर आलेल्या AK-47 प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. या घटनांबाबत केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी करत चव्हाण यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान संसदेकडे मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांकडून कारवाई झाल्याचा आणि काही आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला.

“सभागृहात येऊन प्रश्नांची उत्तरं द्या”

या पार्श्वभूमीवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला अनेक प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान गोळीबार झाला का, पॅलेट गनचा वापर झाला का, एखादा आंदोलक जखमी झाला का, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

बिहारमधील आंदोलनादरम्यान कथितरीत्या AK-47 दाखवण्यात आल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकारचे आदेश कोणी दिले, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी द्यावे, असे चव्हाण म्हणाले.

“अमित शाह यांनी राजीनामा द्यावा”

“संसदेत येऊन सरकारने प्रश्नांची उत्तरं द्यावीत. उत्तरं समाधानकारक असतील तर आम्ही पुढे काही म्हणणार नाही. मात्र सभागृहाला सामोरे जाणे टाळले जात असेल तर हा गंभीर विषय आहे,” असा दावा चव्हाण यांनी केला. अमित शाह अधिवेशनादरम्यान संसदेत उपस्थित न राहिल्याबद्दलही त्यांनी टीका केली. सभागृहात येऊन विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

शिक्षण आणि परीक्षांच्या मुद्द्यावरही सरकारवर निशाणा

नीट परीक्षेपासून विविध स्पर्धा परीक्षांपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने भूमिका घेण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा विद्यार्थ्यांच्या दबावामुळे झाला, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

चव्हाण यांनी पुढील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना विरोधकांनी एकत्र राहण्याची गरज व्यक्त केली. केंद्र सरकारविरोधात विविध प्रश्नांवर विरोधकांनी सातत्याने आवाज उठवला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताबदल होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

Web Title: Prithviraj chavan demands amit shah resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Jantar Mantar
  • pruthviraj chavhan
  • Student Protest

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke News: सौरव दास यांच्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय?; CJPच्या अभिजीत दीपकेंचा सवाल
1

Abhijeet Dipke News: सौरव दास यांच्या कुटुंबाला त्रास का दिला जातोय?; CJPच्या अभिजीत दीपकेंचा सवाल

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
2

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

Parliament Monsoon Session: गृहमंत्र्यांच्या निवेदनाला विरोधकांचा नकार; थेट राजीनाम्याच्या मागणीने संसदेचा शेवटचा दिवसही वादळी
3

Parliament Monsoon Session: गृहमंत्र्यांच्या निवेदनाला विरोधकांचा नकार; थेट राजीनाम्याच्या मागणीने संसदेचा शेवटचा दिवसही वादळी

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
4

Parliament Monsoon Session: अमित शाह यांचे मौन हीच त्यांची कबुली!; राहुल गांधींचे टीकास्त्र, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.